शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
2
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
3
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
4
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
5
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
6
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
7
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
8
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
9
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
10
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
11
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
12
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
13
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
14
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
15
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
16
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
17
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
18
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
19
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
20
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात

Independence Day 2021 : 'कित्येक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता....'

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 08:48 IST

Celebrating Happy Independence Day 2021: पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले "ट्रिस्ट विथ डेस्टिनी' (नियतीशी करार) हे भाषण हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका ऊर्जस्वल ठेवा आहे. त्या भाषणाचा हा भावानुवाद...

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले. 14 ऑगस्टच्या मध्यरात्री संसदेच्या मध्यवर्ती सभागृहात शपथ घेण्यासाठी लोकप्रतिनिधी जमले असताना पंडित जवाहरलाल नेहरू यांनी केलेले "ट्रिस्ट विथ डेस्टिनी' (नियतीशी करार) हे भाषण हा स्वतंत्र भारताच्या इतिहासातील एका ऊर्जस्वल ठेवा आहे. त्या भाषणाचा हा भावानुवाद :

कित्येक वर्षांपूर्वी आपण नियतीशी करार केला होता आणि  आज आपली प्रतिज्ञा पूर्णत्वाने नव्हे परंतु ब-याच अंशी प्रत्यक्षात घेण्याचा क्षण आला आहे .  मध्यरात्रीच्या या प्रशांत समयी सारे जग झोपलेले असताना, भारत स्वातंत्र्याच्या युगात नवा जन्म घेत आहे. इतिहासात असा क्षण क्वचितच येतो. आपण जुने ते सारे त्यागून नव्याकडे जात आहोत.   एका युगाचा अंत होतो आहे.  वर्षानुवर्षे दडपलेला राष्ट्राचा आत्मा आज मुक्त होत आहे. या औपचारिक, धीरगंभीर आणि प्रगल्भ क्षणी;   आपण भारताच्या, भारतवासीयांच्या आणि त्याहूनही मोठ्या अशा  मानवतेप्रति आम्ही समर्पित होऊ अशी प्रतिज्ञा करीत आहोत.  इतिहासाच्या प्रारंभापासूनच भारतभूमीने आपला न संपणारा शोध सुरू केला. शतकानुशतके अविरत संघर्ष केला आणि यश-अपयशाच्या डोंगरदऱ्याही पार केल्या. चांगल्या आणि वाईट काळातदेखील भारताची दृष्टी या शोधापासून कधीही ढळली नाही, भारताला आपल्या या शोधाचा; तसेच स्वतःला शक्ती देणाऱ्या मूल्यांचा कधीच विसर पडला नाही. एका दुर्दैवी कालखंडातील आपला प्रवास आज संपत आहे आणि भारताला पुन्हा एकदा स्वतःचाच शोध लागला आहे, स्वत्वाची जाणीव होते आहे.  हे यश म्हणजे एक संधी आहे : आपल्या प्रतीक्षेत असणाऱ्या अनेक मोठ्या विजयांची आणि यशाची पहिली पायरी आहे.ही संधी प्राप्त करण्याइतका सुज्ञपणा आणि भावी आव्हाने पेलण्याइतके सामर्थ्य आपल्यात आहे का?- हा प्रश्न आज आपण स्वतःला विचारला पाहिजे. स्वातंत्र्य आणि सत्ता यांच्या जोडीने जबाबदारीदेखील येते. सार्वभौम भारतीयांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या घटनासमितीवर ही जबाबदारी आहे.  स्वातंत्र्याचा जन्म होण्याआधी स्वातंत्र्यप्राप्तीसाठी झगडलेल्या या देशाने सर्व प्रकारच्या वेदना सहन केल्या आहेत. त्यात सुख होते, तसे दु:खा आणि क्लेशही होते! त्या आठवणींचा सल अजूनही मनाशी आहे. असो. आता तो भूतकाळ संपला आहे, आपण आपल्या भविष्यकाळाच्या दारात उभे राहिलो आहोत!  हा भावी काळ सहजसाध्य  नाही, विसावा घ्यावा असाही  नाही. आतापर्यंत आपण घेतलेल्या अनेक प्रतिज्ञांची पूर्तता करण्यासाठी आपलयाला अविरत झटावे लागणार आहे. भारताची सेवा म्हणजे भारतातील कोट्यवधी पीडितांची सेवा.  दारिद्य्र, अज्ञान, रोगराई, संधींची असमानता यांचे उच्चाटन म्हणजेच भारताची सेवा.  प्रत्येकाच्या डोळ्यातील प्रत्येक अश्रू पुसला गेला पाहिजे ही आपल्या पिढीतील सर्वांत थोर व्यक्तीची महत्त्वाकांक्षा आहे. हे काम कदाचित आपल्या क्षमतेच्या पलीकडील असेल; परंतु जोपर्यंत दुःख आणि अश्रू असतील, तोपर्यंत आपले काम संपणार नाही. कठोर परिश्रम घ्यावे लागतील, त्यासाठी वाट्याला येईल ते सारे सोसावे लागेल, अथक काम करावे लागेल , तरच आपण पाहिलेली सारी स्वप्ने साकार होऊ शकतील. ही स्वप्ने फक्त भारताची, भारतासाठी नाहीत; ती जगाची स्वप्ने आहेत, जगासाठी पाहिली गेलेली आहेत ! जगभरातील  देश आणि या पृथ्वीवरील सारी माणसे एकमेकांशी इतकी  जोडली गेलेली  आहेत, की कोणा एकाला इतरांपासून विलग करता येईल, अलग राहता येईल, अशी कल्पनासुद्धा करणे शक्य नाही. शांती, स्वातंत्र्य, समृद्धी आणि संकटे हे सारे आजच्या अविच्छिन्न एकमय जगात अविभाज्य आहेत. इतरांपासून फुटून निघालेले,  एकट्याचे असे वेगळे काही यापुढच्या जगात असणार नाही.अवघ्या भारतविश्वातील जनतेचे आपण प्रतिनिधी आहोत . या नात्याने मी सर्वाना आवाहन करतो, स्वातंत्र्याच्या युगात पाऊल टाकत असताना या साहसी प्रवासात  श्रद्धेने आणि विश्‍वासाने आमच्यासोबत असा. ही वेळ क्षुद्र आणि विघातक टीकेची नाही; तसेच अनिष्ट चिंतनाची, विद्वेषाची आणि आरोप-प्रत्यारोपांचीही नाही. भारतमातेची सारी लेकरे जिथे सुखाने नांदू शकतील , अशा स्वतंत्र भारताच्या प्रासादाची उभारणी आपल्याला करायची आहे. 

टॅग्स :Jawaharlal Nehruजवाहरलाल नेहरूIndependence Dayस्वातंत्र्य दिन