मोक्कातील संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

By Admin | Updated: December 6, 2015 02:07 IST2015-12-06T02:07:05+5:302015-12-06T02:07:05+5:30

नाशिक : हिरावाडीतील कमलनगर परिसरातून दरोड्याच्या तयारीत असलेल्या व मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या दहा जणांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने सात दिवसांची वाढ केली आहे़

Increase in police custody of suspected Malkasin | मोक्कातील संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

मोक्कातील संशयितांच्या पोलीस कोठडीत वाढ

शिक : हिरावाडीतील कमलनगर परिसरातून दरोड्याच्या तयारीत असलेल्या व मोक्कान्वये कारवाई करण्यात आलेल्या दहा जणांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने सात दिवसांची वाढ केली आहे़
पंचवटीतील कमलनगर परिसरातून २५ ऑक्टोबरला दरोड्याच्या तयारीत असलेले संशयित जयेश हिरामण दिवे (२५, रा. एरंडवाडी, पंचवटी), राकेश तुकाराम कोष्टी (२९,रा. दत्त चौक, सिडको), कुंदन सुरेश परदेशी (२३, रा. हनुमानवाडी, पंचवटी), सुनील पंढरीनाथ धोत्रे (२५, रा. पेठरोड), लक्ष्मण उर्फ काळू पांडुरंग जाधव (२८, रा. गजानन चौक, पंचवटी), गणेश भास्कर कालेकर (२१), अक्षय कैलास इंगळे (२१, दोघे रा. हनुमानवाडी, पंचवटी), मयुर शिवराम कानडे (२२, रा. शारदा सरस्वती सोसायटी, मेहेरधाम, पेठरोड, पंचवटी) व परीक्षित बाळासाहेब सूर्यवंशी (१९, रा तुळजाभवानीनगर, पंचवटी),राकेश रामदास शेवाळे (२३, इंगळे चाळ, हनुमानवाडी, पंचवटी)यांना पंचवटी पोलिसांनी अटक केली होती़
पोलीस आयुक्त एस़ जगन्नाथन यांच्या आदेशानुसार या संशयितांवर ६ नोव्हेंबरला मोक्कान्वये कारवाई करण्यात आली होती़ तेव्हापासून हे संशयित पोलीस कोठडीत होते, मात्र त्यांची कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते़ न्यायालयाने त्यांच्या कोठडीत सात दिवसांची वाढ केली आहे़(प्रतिनिधी)

Web Title: Increase in police custody of suspected Malkasin