शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलिसांची संख्या ३३ टक्क्यांपर्यंत वाढवा, केंद्र सरकारची राज्यांना सूचना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2021 15:35 IST

पोलीस हा भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीच्या दुसऱ्या यादीत येणारा राज्यांच्या कक्षेतील विषय आहे. त्यामुळे पोलीस दलात महिला पोलिसांची भरती व त्यांची संख्या वाढविण्याची जबाबदारी राज्यांची आहे.

नवी दिल्ली : राज्यांनी त्यांच्या पोलीस दलामध्ये महिलापोलिसांचे प्रमाण ३३ टक्क्यांपर्यंत वाढवावे अशी सूचना केंद्रीय गृह खात्याने केली आहे. पोलीस दलात रिकाम्या असलेल्या पदांपैकी काहींचे रुपांतर महिला पोलीस शिपाई व उपनिरीक्षक पदांमध्ये करावे असेही या खात्याने म्हटले आहे.खासदार कार्ति पी. चिदंबरम यांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लोकसभेत ही माहिती दिली. ते म्हणाले की, सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये पोलिसांची संख्या २० लाख ९१ हजार ४८८ आहे. त्यात महिला पोलिसांची संख्या २ लाख १५ हजार ५०४ म्हणजे एकूण पोलिसांच्या फक्त १०.३० टक्के आहे.पोलीस हा भारतीय राज्यघटनेच्या सातव्या अनुसूचीच्या दुसऱ्या यादीत येणारा राज्यांच्या कक्षेतील विषय आहे. त्यामुळे पोलीस दलात महिला पोलिसांची भरती व त्यांची संख्या वाढविण्याची जबाबदारी राज्यांची आहे. पोलीस दलात पुरुष व महिला पोलिसांच्या संख्येत समतोल राखण्याचे काम राज्यांनी करायचे आहे.

विश्रांती कक्ष हवाकेंद्रीय गृहमंत्री नित्यानंद राय यांनी सांगितले की, महिला पोलिसांसाठी शासकीय निवासस्थाने तसेच वैद्यकीय उपचारांची सुविधा व पोलीस ठाण्यात विश्रांतीसाठी कक्ष या सुविधा राज्य सरकारने देणे आवश्यक आहे.  

टॅग्स :PoliceपोलिसWomenमहिलाMaharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकार