शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दिवसा काम, रात्री अभ्यास! मोबाईल कव्हर विकणारा रोहित होणार डॉक्टर; NEETमध्ये रचला इतिहास
5
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
6
काव्या मारनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर संगीतकार रविचंदरने सोडलं मौन; म्हणाला, "लग्न...?"
7
'फादर्स डे': विराट कोहलीसाठी लेक वामिकाने बनवलं खास ग्रिटींग कार्ड, लिहिलाय खास संदेश
8
परिसरात किती पाणी भरलंय? लगेच कळणार; शहरात रडार लेव्हल ट्रान्समीटर बसवले!
9
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
10
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
11
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
12
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
13
Mumbai Local: मुंबई लोकलमध्ये आता ज्येष्ठ नागरिकांचा डबा
14
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
15
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
16
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
17
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
18
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
19
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
20
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?

'देशात मुस्लीम लोकसंख्या वाढल्यामुळेच बलात्कार अन् खून वाढले'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2018 14:35 IST

उत्तर प्रदेशमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार हरी ओम पांडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. देशातील बलात्कार आणि खून यांसारख्या घटनांना मुस्लीम समाजच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले.

लखनौ - उत्तर प्रदेशमधील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार हरी ओम पांडे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. देशातील बलात्कार आणि खून यांसारख्या घटनांना मुस्लीम समाजच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. देशात मुस्लीम समाजाची वाढती संख्याच, बलात्कार आणि खून यांसारख्या घटनांना कारणीभूत असल्याचे पांडे यांनी म्हटले. तसेच जर मुस्लिमांच्या वाढत्या लोकसंख्येवर लवकरच आळा न बसल्यास आणखी एका पाकिस्तान राष्ट्राची निर्मित्ती व्हायला वेळ लागणार नाही, असेही पांडे यांनी म्हटले.

देशात घडणाऱ्या दहशतवादी कारवाया, खून आणि बलात्कार यांसारख्या गंभीर गुन्ह्यांस मुस्लीम समाजाची वाढती लोकसंख्याच कारणीभूत आहे. देशाच्या स्वातंत्र्यानंतर मुस्लीम समाजाच्या लोकसंख्येत कमालीची वाढ झाल्याचे आपणास दिसून येईल. तर देशातील अर्थव्यवस्थेच्या कमतरतेला आणि बेरोजगारीलाही मुस्लीम समाजच जबाबदार असल्याचे त्यांनी म्हटले. नुकतेच लोकसंख्येला आळा घालण्यासंदर्भातील विधेयकावर संसंदेत चर्चा झाली होती, त्यानंतर पांडे यांनी हे वक्तव्य केले आहे. हे विधेयक संमत झाल्यास दुसरा पाकिस्तान निर्माण होण्यापासून देश वाचेल, असेही ते म्हणाले. दरम्यान, भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यांची स्पर्धा सुरुच असल्याचे दिसून येत आहे. नुकतेच कर्नाटकतील भाजप आमदार बसनगौडा पाटील यांनीही वादग्रस्त वक्तव्य केले होते. जर, मी गृहमंत्री असतो, तर बुद्धिजीवी लोकांना गोळ्या घातल्या असत्या, असे पाटील यांनी कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना म्हटले होते.

 

टॅग्स :BJPभाजपाMuslimमुस्लीमPakistanपाकिस्तानUttar Pradeshउत्तर प्रदेश