शाहरूख खानला दणका, अलिबागमधलं फार्महाऊस सील
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2018 19:43 IST2018-01-30T18:18:37+5:302018-01-30T19:43:40+5:30
बॉलिवूडचा अभिनेता शाहरूख खान याला आयकर विभागाने दणका दिला आहे. अलिबाग येथील त्याचा 'डेजाऊ' बंगला आयकर विभागाने सील

शाहरूख खानला दणका, अलिबागमधलं फार्महाऊस सील
रायगड : बॉलिवूडचा अभिनेता शाहरूख खान याला आयकर विभागाने दणका दिला आहे. अलिबाग येथील त्याचा 'डेजाऊ' बंगला आयकर विभागाने सील केल्याची माहिती आहे. बेनामी संपत्ती म्हणून आयकर विभागाने ही कारवाई केल्याचं वृत्त आहे. शाहरुखने अलीबागमध्ये ही जमीन शेतीसाठी खरेदी केली होती, पण त्या जागेवर त्याने एक फार्महाऊस बांधलं. मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने यासंबंधी शाहरूखला नोटीस पाठवून 90 दिवसांत उत्तर देण्यास सांगितलं होतं. अखेर आज त्याचा बंगला सील करण्यात आला. (सविस्तर वृत्त लवकरच)