नापिकीला कंटाळून शेतकर्‍याने मृत्यूला कवठाळले गौर येथील घटना : विषारी औषध घेऊन आत्महत्या

By Admin | Updated: December 14, 2014 00:07 IST2014-12-12T16:56:31+5:302014-12-14T00:07:16+5:30

मसलगा : दुष्काळी परिस्थितीमुळे नापिकीला कंटाळून गौर (ता़ निलंगा) येथील एका शेतकर्‍याने शेतात विषारी औषध प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना गुरुवारी रात्री घडली़

The incident took place in Gaur, a farmer killed by a napkin: Suicide by taking poisonous medicine | नापिकीला कंटाळून शेतकर्‍याने मृत्यूला कवठाळले गौर येथील घटना : विषारी औषध घेऊन आत्महत्या

नापिकीला कंटाळून शेतकर्‍याने मृत्यूला कवठाळले गौर येथील घटना : विषारी औषध घेऊन आत्महत्या

मसलगा : दुष्काळी परिस्थितीमुळे नापिकीला कंटाळून गौर (ता़ निलंगा) येथील एका शेतकर्‍याने शेतात विषारी औषध प्राशन करुन जीवनयात्रा संपविल्याची घटना गुरुवारी रात्री घडली़
संग्राम सखाराम कारेकंटे (४८ रा़ गौर) असे आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचे नाव आहे़ संग्राम कारीकंटे यांच्या नावे ५ एकर १५ गुंठे शेती आहे़ गेेल्या दोन वर्षांपूर्वी त्यांनी शेतीमध्ये कुपनलिका घेतली होती़ परंतु, यंदा पाऊस कमी झाल्याने कुपनलिका कोरडी पडली़ कुटुंबाचा उदरनिर्वाह हा शेतीवर असून कुटुंबात ८ जण आहेत़ गेल्या वर्षी त्यांनी एका मुलीचा विवाह केला होता़ ही विवाहित मुलगी बाळंतपणासाठी माहेरी आली होती़ त्याचबरोबर एक मुलगी उपवर झाली असून दोन मुलांच्या शिक्षण घेत आहेत़ दुष्काळी परिस्थितीमुळे या सर्वांचा खर्च भागविणे कठीण झाल्याचे आणि बॅंकेचे कर्ज फेडणे शक्य होत नसल्याचे ते नेहमी आपल्याला सांगत होते, असे त्यांची सुरेखा कारेकंटे यांनी सांगितले़
गेल्या फेब्रुवारी, मार्च मध्ये गारपीट झाल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले़ त्यातच पावसाळ्यात अल्प पाऊस झाल्याने खरीपातील लागवडीचा खर्चही निघाला नाही़ अशातच रबीची पेरणी केली होती़ परंतु, पिकाची स्थिती दैयनीय असल्याने ते वैफल्यग्रस्त बनले होते़ गुरुवारी सायंकाळी ते शेताकडे जाऊन येतो, असे घरी सांगून गेले़ त्यानंतर शेतात त्यांनी विषारी औषध प्राशन केले़ ते घराकडे परतले नसल्याचे पाहून कुटुंबातील मंडळींनी शेताकडे जाऊन त्यांचा शोध घेतला असता संग्राम यांनी विषारी औषध प्राशन केल्याने आढळून आले़ त्यामुळे त्यांना उपचारासाठी लातूरच्या शासकीय रुग्णालयात आणण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला़ वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी केली असता त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले़ त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, दोन मुले असा परिवार आहे़

चौकट़़़
दिवसभर घेतली मित्रांची भेट़़़
नैराश्यात असलेल्या संग्राम कारेकंटे यांनी गुरुवारी दिवसभर आपल्या मित्रांच्या व जवळच्या नातेवाईकांच्या भेटी घेतल्या आणि रात्री विषारी औषध प्राशन केले़ याप्रकरणी गांधी चौक पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे़ लातूरच्या शासकीय रुग्णालयात संग्राम कारेकंटे यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले़ घटनास्थळास मंडळ अधिकारी धुमाळ, तलाठी बी़ व्ही़ कदम, कृषी सहाय्यक डी़ एल़ कळसे यांनी भेट देऊन पंचनामा केला़

Web Title: The incident took place in Gaur, a farmer killed by a napkin: Suicide by taking poisonous medicine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.