बुलडाणा अर्बन बँकेच्या बाळापूर शाखेचे उद्घाटन
By Admin | Updated: May 6, 2014 17:09 IST2014-05-06T17:09:04+5:302014-05-06T17:09:04+5:30
बाळापूर: बुलडाणा अर्बन बँकेच्या बाळापूर येथील शाखेचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. मुकेश झंवर यांच्या हस्ते बँकेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी संचालक ॲड. सतीश भुतडा, नंदकिशोर धनोकार (वाडेगाव), विश्वनाथ बावनथडे, बुलडाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक विजय दळवी आदी उपस्थित होते. डॉ. मुकेश झंवर यांनी बुलडाणा अर्बन ही बँकिंग क्षेत्रात काम करताना सामाजिक दायित्व निभावतानाच ठिकठिकाणी गोदाम बांधून शेतकर्यांना शेतमाल ठेवण्याची सुविधा पुरवते, असे सांगितले. या कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक शिवाजी म्हैसने, सत्यनारायण शर्मा, गजानन धनमोडे, विठ्ठल सरप, अशोक वानखडे, कन्हैया ठाकूर आदी उपस्थित होते. याप्रसंगी पवन पवार यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)

बुलडाणा अर्बन बँकेच्या बाळापूर शाखेचे उद्घाटन
ब ळापूर: बुलडाणा अर्बन बँकेच्या बाळापूर येथील शाखेचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. मुकेश झंवर यांच्या हस्ते बँकेच्या शाखेचे उद्घाटन करण्यात आले. या प्रसंगी संचालक ॲड. सतीश भुतडा, नंदकिशोर धनोकार (वाडेगाव), विश्वनाथ बावनथडे, बुलडाणा अर्बनचे विभागीय व्यवस्थापक विजय दळवी आदी उपस्थित होते. डॉ. मुकेश झंवर यांनी बुलडाणा अर्बन ही बँकिंग क्षेत्रात काम करताना सामाजिक दायित्व निभावतानाच ठिकठिकाणी गोदाम बांधून शेतकर्यांना शेतमाल ठेवण्याची सुविधा पुरवते, असे सांगितले. या कार्यक्रमाला बाजार समितीचे संचालक शिवाजी म्हैसने, सत्यनारायण शर्मा, गजानन धनमोडे, विठ्ठल सरप, अशोक वानखडे, कन्हैया ठाकूर आदी उपस्थित होते. याप्रसंगी पवन पवार यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी) टिप- जाहिरात पार्टीची बातमी 8 बाय 6 साईजमध्ये घेणे.