हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये मुलांनी बॉल समजून उचलला बॉम्ब, स्फोटात दोन मुले जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2025 14:46 IST2025-04-16T14:46:18+5:302025-04-16T14:46:38+5:30
Murshidabad News: हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये आता एका गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. शमशेरगंज परिसरात गावठी बॉम्ब फुटून झालेल्या स्फोटात दोन मुले जखमी झाली आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.

हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबादमध्ये मुलांनी बॉल समजून उचलला बॉम्ब, स्फोटात दोन मुले जखमी
केंद्र सरकारने केलेल्या वक्फ बोर्ड सुधारणा कायद्यामुळे देशातील काही भागात तणावाचं वातावरण आहे. तसेच या कायद्याविरोधात आंदोलनंही होत आहेत. दरम्यान, वक्फ सुधारणा कायद्यावरून सुरू झालेल्या आंदोलनाला पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद येथे हिंसक वळण लागलं होतं. त्यामुळे येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे. दरम्यान, याच मुर्शिदाबादमध्ये आता एका गावठी बॉम्बचा स्फोट झाल्याचं वृत्त आहे. शमशेरगंज परिसरात गावठी बॉम्ब फुटून झालेल्या स्फोटात दोन मुले जखमी झाली आहेत. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले.
शमशेरगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील उत्तर मोहम्मदपूर परिसरात ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मैदानात मुलं खेळत होती, या दरम्यान, बॉल समजून त्यांनी एक बॉम्ब उचलला. तसेच त्या बॉम्बसोबत खेळू लागली. याचदरम्यान, या बॉम्बचा स्फोट झाला. या स्फोटामध्ये दोन मुले जखमी झाली. दोन्ही जखमी मुलांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पोलिसांनी घटनेची चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, येथीलच धुलियन परिसरात एका दुकानामध्ये आग लागली होती. ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आल्याचा आरोप लोकांनी केला आहे. याबाबतची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच त्यांनी घटनेबाबत माहिती घेतली.