शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

एका प्रियकरासाठी दोन मैत्रिणींमध्ये भररस्त्यात तुफान हाणामारी; वाद चिघळताच तरूण फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 12:53 IST

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातीलवाराणसी येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. प्रेम आंधळे असते असे बोलले जाते. प्रेमीयुगुल प्रेमाच्या नदीत इतके बुडलेले असतात की त्यांना समाजाची भीतीही वाटत नाही आणि त्यांचे प्रेम मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात. वाराणसीमध्ये रविवारी असाच एक प्रकार पाहायला मिळाला, जिथे प्रियकरासाठी दोन तरुणी एकमेकांशी भिडल्या. दोघींमध्ये बराच वेळ हाणामारी सुरू होती. महिला पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघींनाही पोलीस ठाण्यात आणून कडक सूचना दिल्या. यानंतर पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांना समज देण्यात आली.

दरम्यान, प्रियकरासाठी भररस्त्यात 2 तरूणींची हाणामारी पाहून सर्वांनाच धक्का बसला. या घटनेचा व्हिडीओ देखील व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वाराणसीच्या मांडूवाडीह येथे राहणाऱ्या एका तरुणाचे शहरातील एका तरुणीशी जवळपास दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. 

प्रेयसीला भांडताना पाहून प्रियकर फरारयादरम्यान संबंधित प्रियकराने दुसऱ्या एका तरुणीशी देखील मैत्री केली. मात्र, त्याच्या प्रेयसीला याची माहिती नव्हती. मकर संक्रांतीच्या दिवशी तरुणाने आपल्या पहिल्या मैत्रिणीला भेटण्यासाठी बोलावले. तिथे भाजी मार्केटजवळ तो त्याच्या मैत्रिणीशी बोलत होता. 

प्रियकराने काढला पळ तेवढ्यात त्या तरूणाची प्रेयसी त्याच मार्गाने कुठेतरी जात होती. अचानक तिची नजर रस्त्याच्या कडेला असलेल्या तिच्या प्रियकरावर गेली तेव्हा ती स्तब्ध झाली. प्रियकराला दुसऱ्या मुलीसोबत पाहून ती संतापली. तिने प्रियकरासोबत असलेल्या मुलीची विचारपूस सुरू केल्यावर काही वेळातच दोघींमध्ये वाद सुरू झाला. दोघींमधील वाद हाणामारीत पोहोचला आणि त्या दोघी रस्त्याच्या मधोमध एकमेकींना मारहाण करू लागल्या. दोघींमध्ये भांडण सुरू होताच प्रियकराने घटनास्थळावरून पळ काढला. काही लोकांनी भांडण सोडवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांचा हा प्रयत्न निष्फळ ठरला. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशVaranasiवाराणसीPoliceपोलिस