शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! कडाक्याच्या थंडीमुळे पत्नीचा मृत्यू; गरीब शेतकऱ्यावर भीक मागून अंत्यसंस्कार करण्याची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 12:06 IST

उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरमध्ये थंडीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

शाहजहांपूर : उत्तर प्रदेशातीलशाहजहांपूरमध्ये थंडीमुळे मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेचा कडाक्याच्या थंडीमुळे मृत्यू झाल्यानंतर तिच्या पतीने भीक मागून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले. खरं तर पती लोकांकडे भीक मागतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पती थंडीमुळे पत्नीच्या मृत्यूचे कारण सांगत असले तरी दुसरीकडे मात्र प्रशासन थंडीमुळे मृत्यूचे कारण मानत नसून अन्य काही कारण देत आहे.

दरम्यान, गंगाराम या वृद्ध व्यक्तीची 48 वर्षीय पत्नी गीता देवी यांचा थंडीमुळे मृत्यू झाला. गंगाराम यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. सरकारी मदतीसाठी गंगाराम यांनी अनेकवेळा अधिकाऱ्यांकडे फेऱ्या मारल्या, पण मदत मिळू शकली नाही. गंगाराम यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते खूप गरीब आहेत. त्यांच्याकडे ना रेशनकार्ड आहे, ना भांडी ना उदरनिर्वाह करण्याचे कोणते साधन. त्यांना कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही. त्यांची पत्नी मानसिकदृष्ट्या कमकुवत होती. पत्नीच्या मृत्यूनंतर गंगाराम यांनी गावातील लोकांकडून पैसे मागून मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.  

थंडीमुळे नाही तर अन्नाअभावी मृत्यू - एसडीएमयाप्रकरणी एसडीएम हिमांशू उपाध्याय यांनी म्हटले, "आम्ही नायब तहसीलदारांना तिथे पाठवले होते, तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांचा मृत्यू थंडीमुळे नाही तर जेवण न केल्यामुळे झाला आहे. गंगाराम यांच्या आपत्ती व्यवस्थापन योजनेंतर्गत शक्य ती सर्व मदत केली जाईल आणि त्यांच्या शिधापत्रिकेसाठी अर्ज करण्यात आला आहे. त्यांच्या राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्थाही करण्यात येणार आहे." 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशshahjahanpur-pcशाहजहांपूरDeathमृत्यूFarmerशेतकरी