शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेमात तरूणाचे धक्कादायक कृत्य; 6वीतील मुलीच्या गळ्यावर सुरी ठेवली अन् भरला 'मांग में सिंदूर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2023 11:15 IST

उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील महाराजगंज जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या प्रियकराने 6वीत शिकणाऱ्या मुलीच्या गळ्यावर सुरी ठेवून तिच्या कपाळावर कुंकू लावले. आरोपी देखील अल्पवयीन असून तो आठवीत शिकत असल्याचे सांगण्यात येत आहे. पीडित कुटुंबाचा आरोप आहे की मुलाने अनेकदा त्यांच्या मुलीचा विनयभंग केला. त्यामुळे त्यांच्या पीडित मुलीने शाळेत जाणे बंद केले होते.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही गावातील एकाच शाळेत शिकत असून मुलगा अनेकदा मुलीची छेड काढायचा. सोशल नेटवर्कमुळे मुलीच्या कुटुंबीयांनी याबाबत कोणाकडे तक्रार केली नाही आणि शाळेतून तिचे नाव काढून टाकल्यानंतर तिला गावातील दुसऱ्या शाळेत प्रवेश मिळवून दिला. तरीदेखील आरोपी तरूणाने तिचा पाठलाग सोडला नाही आणि या ना त्या कारणाने तो घराभोवती फिरकू लागला. 

अल्पवयीन आरोपीला घेतलं ताब्यात शनिवारी सायंकाळी चार वाजता आरोपी मुलगा मित्रासह दुचाकीवरून पीडित विद्यार्थिनीच्या घरी पोहोचला आणि तिच्या गळ्यावर चाकू ठेवून कपाळावर कुंकू लावले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली. ही बाब निदर्शनास आल्यानंतर कोतवाली पोलिसांनी माहितीच्या आधारे आरोपी अल्पवयीन विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले. आरोपी अल्पवयीन असल्याने त्याला जुनेबिल न्यायालयात हजर करण्यात आले.

गळ्यावर चाकू ठेवला अन् भरला 'मांग में सिंदूर'पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सायंकाळी त्यांची मुलगी झाडू काढत होती. आरोपीने दुचाकीवरून खाली उतरून तिचा दुपट्टाही खेचला. त्यानंतर परिसरातील लोकांसमोर मुलीच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि कपाळावर कुंकू लावून तिथून पळ काढला. त्यांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला मात्र, त्याने पळून जाण्यात यश मिळवले. याप्रकरणी पोलिसांनी अल्पवयीन आरोपी विद्यार्थ्याविरुद्ध कलम 354, 354 बी आणि 352 आयपीसी अंतर्गत गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस