शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Crime: "कारवाई टाळायची असेल तर 1 लाख 10 हजार दे... ", बनावट IPS बनून पोलीस कॉन्स्टेबलला लुटले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 16:52 IST

उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक पोलीस हनीट्रॅपचा बळी ठरला आहे.

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एक पोलीस हनीट्रॅपचा बळी ठरला आहे. पीडित पोलिसाने सांगितले की, अश्लील व्हिडीओ कॉल आल्यानंतर आरोपीने त्याला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली आणि 1 लाख 10 हजार रुपयांची मागणी केली. वारंवार फोन केल्याने व्यथित झालेल्या पोलिसाने शहागंज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. खरं तर एक महिन्यापूर्वी संबंधित पोलिसाला व्हिडीओ कॉल आला होता ज्यामध्ये अश्लील व्हिडीओ दाखवण्यात आली होती. 

दरम्यान, अनोळखी व्यक्ती असल्याचे समजताच पोलिसाने कॉल कट केला. पण वारंवार फोन येऊ लागले आणि अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवण्यात आले. याबाबात पोलीस लाईनचे हेड कॉन्स्टेबल हरिराम शर्मा यांनी सांगितले, त्यांना अनेकवेळा वेगवेगळ्या फोनवरून फोन आले आणि त्यांच्याकडून 10 हजार रूपयांची मागणी केली. दुसऱ्या दिवशी पुन्हा फोन आला आणि त्याने दिल्ली पोलिसांत आयपीएस अधिकारी असल्याचे सांगितले. तसेच तुला अटक करण्यासाठी टीम येत असल्याचे नकली अधिकाऱ्याने पोलिसाला सांगितले. तसेच तुम्हाला कारवाई टाळायची असेल तर 25,000 रुपये तात्काळ जमा करा. मग पीडित हरिराम शर्मा यांनी आपली इज्जत वाचवण्यासाठी ही रक्कम जमा केली. 

IPS बनून पोलीस हवालदाराला लुटले बनावट आयपीएसने पुन्हा फोन करून मुलीने आत्महत्या केल्याचे सांगितले. तिने सुसाईड नोटमध्ये तीन जणांची नावे लिहिली असून त्यापैकी एक नाव तुझे आहे. अटक टाळण्यासाठी हरिराम या पोलीस हवालदाराने पुन्हा आपल्या खात्यातील 50 हजार रुपये दिले. यानंतरही ब्लॅकमेलिंगची मालिका सुरूच राहिली. याला कंटाळून हरिराम शर्मा या पोलिसाने या प्रकरणाची तक्रार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे केली. शहागंज पोलीस ठाण्यात मोबाईल क्रमांकाच्या आधारे अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस आता त्या संबंधित आरोपीचा अधिक तपास करत आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीhoneytrapहनीट्रॅपPoliceपोलिस