पतीचा हार्टअटॅकनं मृत्यू, मृतदेह घरी पोहचताच पत्नीनंही दिला जीव; काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2024 13:49 IST2024-02-27T13:47:28+5:302024-02-27T13:49:33+5:30

मात्र पतीला रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून पतीला मृत घोषित केले

In UP, Husband died of heart attack, wife also died due to jumping from 7th floor of house | पतीचा हार्टअटॅकनं मृत्यू, मृतदेह घरी पोहचताच पत्नीनंही दिला जीव; काय घडलं?

पतीचा हार्टअटॅकनं मृत्यू, मृतदेह घरी पोहचताच पत्नीनंही दिला जीव; काय घडलं?

गाझियाबाद - उत्तर प्रदेशातील गाझियाबाद इथं एका महिलेच्या पतीचा हार्ट अटॅकनं मृत्यू झाला. पतीच्या अचानक झालेल्या मृत्यूचा धक्का पत्नीला सहन झाला नाही. त्याच धक्क्यात तिने सातव्या मजल्यावरून उडी घेऊन जीव दिला. या घटनेने परिसरात खळबळ माजली. घटनेची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी पत्नीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमोर्टमला पाठवला आहे. 

हे प्रकरण गाझियाबादच्या कौशांबी परिसरातील आहे. इथं सेक्टर ३ मध्ये राहणाऱ्या एका नवविवाहितीने पतीच्या हार्ट अटॅकनंतर सातव्या मजल्यावरून उडी मारली. या घटनेमुळे एकाच घरातून २ जणांच्या अंत्ययात्रा एकाचवेळी निघाल्या. या महिलेचं ३० नोव्हेंबरला लग्न झाले होते. सोमवारी ती पतीसोबत दिल्लीतील प्राणी संग्रहालयात फिरायला गेली होती. त्याठिकाणी पतीच्या छातीत अचानक दुखायला लागले. त्यानंतर पतीला हॉस्पिटलला नेण्यात आले. 

मात्र पतीला रुग्णालयात नेईपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. डॉक्टरांनी तपासून पतीला मृत घोषित केले. संध्याकाळी उशीरा पतीचा मृतदेह घरी नेण्यात आला. परंतु पतीच्या अचानक निधनानं पत्नीला जबर धक्का बसला. तिने घरच्या सातव्या मजल्यावरील बाल्कनीतून उडी घेतली. जखमी अवस्थेत पत्नीला जवळच्या रुग्णालयात नेले. मात्र तिथून पत्नीची अवस्था पाहता दिल्लीतील सफदरगंज रुग्णालयात तिला हलवलं. त्याठिकाणी उपचारावेळी पत्नीचा मृत्यू झाला. 

३ महिन्यापूर्वीच झालं होतं लग्न

माहितीनुसार, मृत अंजलीचे वय २२ वर्ष होते, तिच्या पतीचे वय २५ वर्ष इतकं होते. अभिषेक प्रॉपर्टी डिलर होता. गाझियाबादच्या वैशाली इथं राहणाऱ्या अभिषेकचं मागच्या ३० नोव्हेंबरला दिल्लीतील करावल इथल्या अंजलीसोबत लग्न झाले. मात्र लग्नाच्या अवघ्या काही महिन्यातच या दोघांचा दुर्दैवी अंत झाला. 
 

Web Title: In UP, Husband died of heart attack, wife also died due to jumping from 7th floor of house