शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल, या नेत्यांकडे महत्त्वाची जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2023 15:31 IST

Lok Sabha Elections 2024: भाजपाने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमधील आपल्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले आहेत.

भाजपाने पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राज्यांमधील आपल्या पक्षसंघटनेत मोठे फेरबदल केले आहेत. भाजपानेबिहार विधान परिषदेतील सदस्य सम्राट चौधरी यांची बिहारच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे, तर चित्तौडगड येथील खासदार चंद्रप्रकाश जोशी यांची राज्यस्थानच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड केली आहे.

पक्षाचे सरचिटणीस अरुण सिंह यांनी पत्रक प्रसिद्ध करून या संदर्भातील माहिती दिली आहे. त्यानुसार दिल्ली भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांची दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर ओदिशामधील माजी मंत्री आणि ज्येष्ठ नेते मनमोहन सामल यांची ओदिशाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. 

सिंह यांनी सांगितले की, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी या नियुक्त्यांना हिरवा झेंडा दाखवला आहे.  या नियुक्त्या तात्काळ प्रभावाने लागू होणार आहेत. कुशवाहा समाजातून येणारे सम्राट चौधरी हे बिहारमधील दिग्गज नेते राहिलेल्या शकुनी चौधरी यांचे पुत्र आहेत. शकुनी चौधरी हे सात वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. सम्राट चौधरी बिहार भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून संजय जायसवाल यांच्याकडून पदभार स्वीकारतील. 

तर भाजपाचे राजस्थानमधील नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रप्रकाश जोशी यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळवला होता. ते दुसऱ्यांदा लोकसभेत पोहोचले होते. ते सतीश पूनिया यांच्याकडून पदभार स्वीकारतील. दिल्लीचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांची गतवर्षी दिल्लीतील भाजपाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. तर ओदिशाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष मनमोहन सामल हे मोहंती यांची जागा घेतील.  

टॅग्स :BJPभाजपाPoliticsराजकारणBiharबिहारRajasthanराजस्थान