शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची मदार ‘अँटी इन्कम्बन्सी’वर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2022 13:16 IST

विधानसभेच्या ७० जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्य म्हणून अस्तित्वात आल्यापासून, नारायणदत्त तिवारी यांचा पाच वर्षांचा कालखंड वगळता उत्तराखंडच्या नशिबी स्थैर्य आलेच नाही.

रवी टाले - डेहराडून : उत्तराखंड विधानसभा निवडणुकीचे मतदान अवघ्या सहा दिवसांवर येऊन ठेपले असताना, सत्ताधारी भारतीय जनता पक्षाची मदार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्म्यावर, तर सत्तेची स्वप्ने बघत असलेल्या काँग्रेसची ‘अँटी इन्कम्बन्सी’वर असल्याचे चित्र दिसत आहे. विधानसभेच्या ७० जागांसाठी १४ फेब्रुवारीला मतदान होणार आहे. राज्य म्हणून अस्तित्वात आल्यापासून, नारायणदत्त तिवारी यांचा पाच वर्षांचा कालखंड वगळता उत्तराखंडच्या नशिबी स्थैर्य आलेच नाही. राज्याने उण्यापुऱ्या दोन दशकांत तब्बल दहा मुख्यमंत्री बघितले. गत निवडणुकीत भाजपला प्रचंड बहुमत लाभूनही पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री नशिबी आले. २०१७ मध्ये दिसली तशी मोदींची लाट यावेळी दिसत नसली तरी, त्यांचा जादुई करिश्मा कायम आहे आणि त्या बळावर यावेळीही तरून जाऊ, अशी भाजपची अपेक्षा आहे.   राज्यात एकूण १३ जिल्ह्यांत ७० विधानसभा मतदारसंघ असले, तरी त्यापैकी तब्बल ३० डेहराडून, हरिद्वार आणि उधमसिंगनगर या तीनच जिल्ह्यांत आहेत. त्यापैकी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी जिल्ह्याला सीमा लागून असलेल्या उधमसिंगनगर जिल्ह्यात शीख शेतकऱ्यांची मोठी संख्या आहे आणि त्यांनी भाजपची डोकेदुखी वाढवली आहे.  

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडUttarakhand Assembly Election 2022उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२congressकाँग्रेसBJPभाजपा