शहरं
Join us  
Trending Stories
1
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी महागाईचा झटका, एलपीजी सिलेंडरच्या दरात मोठी वाढ
2
Mumbai Rains: २०२६ च्या पहिल्याच दिवशी मुंबई चिंब भिजली! थंडीत पावसाच्या सरींनी मुंबईकर चक्रावले
3
भाजपच्या बंडोबांना थंडोबा करण्यासाठी मुख्यमंत्र्यांची उडी; अनेक नेत्यांवर जबाबदारी
4
आजचे राशीभविष्य १ जानेवारी २०२६ : नववर्षाचा पहिला दिवस 'या' राशींसाठी ठरणार लाभदायी; वाचा १२ राशींचे सविस्तर भविष्य
5
'नाराज'कीय वातावरण तापले! निष्ठावंतांचा संताप कायम; मंत्री सावेंच्या कारला काळं फासण्याचा प्रयत्न, कराडांना घेराव, पदाधिकाऱ्याच्या कानशिलात
6
नाशिक-अक्कलकोट कॉरिडॉरला हिरवा कंदील, १७ तासांचा प्रवास आणि २०१ किमीचे अंतर वाचणार
7
आजपासून नेमके काय बदलणार? एलपीजी, सीएनजी स्वस्त? पीएफच्या नियमांत मोठे बदल!
8
टीव्ही-फ्रिजसह अनेक उपकरणांवर आजपासून ‘रेटिंग’ बंधनकारक, केंद्र सरकारचा मोठा निर्णय; वीज, इंधनाची होणार बचत
9
मुंबईत रिपब्लिकन पक्षाला १७ ऐवजी १२ जागा : आठवले
10
अल्प बचत योजनांचे व्याजदर सलग सातव्यांदा ‘जैसे थे’च
11
मराठी भाषा ही मराठी माणसांनीच वाचवली पाहिजे! संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांची स्पष्टोक्ती
12
मीरारोड मध्ये नाराज माजी भाजपा नगरसेवकाने उभे केले अपक्षांचे पॅनल 
13
सदानंद दाते राज्याचे नवे पोलिस महासंचालक, असा आहे आतापर्यंतचा कार्यकाळ
14
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला जपानमध्ये ६ रिश्टर स्केलचा भूकंप, नागरिकांमध्ये घबराट!
15
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
16
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
17
डिलिव्हरी बॉयला जमिनीवर पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवलं; नागपुरातील घटनेनं नेटकरी भडकले!
18
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
19
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
20
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
Daily Top 2Weekly Top 5

Bihar Elections: बिहारमधील विधान परिषद निवडणुकीत भाजपा, जेडीयूला धक्का, सर्वाधिक जागा जिंकल्या, पण संख्या घटली

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2022 13:17 IST

Bihar Legislative Council elections: बिहारमधील विधान परिषदेच्या निवडणुकीत एनडीएची सरशी झाली आहे. एकूण २४ जागांपैकी २२ जागांचे निकाल हाती आले असून, एनडीएला १३ जागा मिळाल्या आहेत. यात जदयूला ५ व भाजपला ८ जागा मिळाल्या आहेत.

-एस. पी. सिन्हापाटणा : बिहारमधील विधान परिषदेच्या निवडणुकीत एनडीएची सरशी झाली आहे. एकूण २४ जागांपैकी २२ जागांचे निकाल हाती आले असून, एनडीएला १३ जागा मिळाल्या आहेत. यात जदयूला ५ व भाजपला ८ जागा मिळाल्या आहेत. राजदला ५ व अपक्षांनी तीन जागी बाजी मारली आहे. काँग्रेसने एका जागी विजय प्राप्त केला आहे. या निकालाने जदयू, भाजप प्रदेशाध्यक्षांसह अनेक बड्या बड्यांना धक्का दिला.

मुख्यमंत्री नितीशकुमार यांचा पक्ष जदयूचे राष्ट्रीय अध्यक्ष ललन सिंह हे आपल्या संसदीय मतदारसंघातून उमेदवाराला निवडून आणण्यात अपयशी ठरले. त्याचप्रमाणे भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. संजय जायसवाल हेही आपल्या संसदीय मतदारसंघातून दोन्ही जागा निवडून आणण्यात अपयशी ठरले. याचबरोबर बिहार विधान परिषदेत राजदला विरोधी पक्षनेते पदासाठी आवश्यक असलेले संख्याबळ मिळाले आहे. याचाच अर्थ राबडीदेवी यांचे विरोधी पक्षनेतेपद वाचले आहे, असा काढला जात आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थेतून झालेल्या निवडणुकीत पाटणा जागेवर कार्तिक सिंह (१८८६ मते) यांनी अपक्ष कर्णवीर सिंह यादू ऊर्फ लल्लू     मुखिया (१७०६) यांच्यावर मातकेली. जदयू उमेदवार वाल्मिकी सिंह (१३८८) तिसऱ्या स्थानावर राहिले. कटिहारमध्ये अशोक अग्रवाल (१७३८) यांनी दुसऱ्या फेरीत विजय मिळविला. राजदचे कुंदन यादव (९४२) व काँग्रेसचे सुनील यादव (८०१) यांचा त्यांनी पराभव केला.छपरामध्ये भाजपचा पराभव झाला. भाजपचे बंडखोर उमेदवार सच्चिदानंद राय यांनी पुन्हा विजय मिळविला.

कोणी, किती लढविल्या- एनडीएमध्ये भाजपने १२ व जदयूने ११ उमेदवार तसेच रालोजपाने एका जागेवर उमेदवार मैदानात उतरविले होते. राजद २३ व सीपीआयने एक जागा लढली होती.- यावेळी महागठबंधनपासून वेगळे होऊन काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढविली होती. काँग्रेसने आठ जागी, मुकेश सहनी यांच्या विकासशील इन्सान पार्टीने (व्हीआयपी) सात तर चिराग पासवान यांच्या पक्षाने सहा जागांवर निवडणूक लढविली होती.- या निवडणुकीपूर्वी भाजपकडे सर्वाधिक १३ जागा होत्या. २०१६मध्ये भाजपने ११ जागा जिंकल्या होत्या. त्यानंतर दोन आमदार भाजपमध्ये गेल्यानंतर त्यांची संख्या वाढून १३ झाली होती.- यावेळी भाजपने केवळ १२ जागा लढविल्या होत्या. पक्षाने आपल्या कोट्यातील मधुबनीची जागा जदयूला दिली होती. मागील वेळी जदयूकडे पाच जागा होत्या. परंतु नंतर राजदचे तीन आमदार जदयूमध्ये गेल्याने आमदारांची संख्या आठ झाली होती.

 

टॅग्स :BJPभाजपाBiharबिहारPoliticsराजकारण