शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
2
राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'ला निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर; 15 मुद्दे मांडत सर्व आरोप फेटाळले
3
देशविरोधी शक्तींसोबत मिळून भारतात षडयंत्र रचलं जातंय; भाजपाचा राहुल गांधींवर गंभीर आरोप
4
सोनाराच्या दुकानात ४ वर्ष काम केलं, रोज थोडं थोडं करून २.५ कोटींचं सोनं गायब केलं! कशी पकडली गेली चोरी?
5
पाकिस्तानातील सर्वात श्रीमंत महिला क्रिकेटर, जिचं नाव कायम चर्चेत; किती संपत्तीची आहे मालकीण?
6
१०० हून अधिक देशांमध्ये २०,००० स्टोअर्स, जागतिक विक्रीत २ टक्के वाढ; तरी का काढलंय विकायला?
7
अमेरिकेतील महापौर भारतातील महापौरापेक्षा किती पॉवरफुल असतो? जगभर इतकी चर्चा का होते?
8
"मी तेजश्रीच्या लग्नासाठी उत्सुक...", सुबोध भावे असं म्हणताच अभिनेत्री काय म्हणाली?
9
“उद्धव ठाकरेंचा निवडणुकीसाठी दौरा, CM असताना शेतकऱ्यांना काय दिले?”; शिंदे गटाचा पलटवार
10
Bigg Boss 19: 'बिग बॉस हिंदी'कडून मराठमोळ्या प्रणित मोरेवर अन्याय? शोसाठी मिळालं सगळ्यांपेक्षा कमी मानधन
11
Moto G67 Power: ७०००mAh बॅटरी आणि चार कॅमेरे; मोटो जी६७ पॉवर भारतात लॉन्च!
12
भारत, चीन, तुर्कस्तान... तीन देशांनी घेतला असा निर्णय की रशियाला होतंय नुकसान, ट्रम्प यांच्यामुळे नाईलाज
13
"अभी नहीं तो कभी नहीं!" अभिषेक शर्माला किंग कोहलीच्या ऑल टाइम रेकॉर्डची बरोबरी करण्याची शेवटची संधी
14
परदेशी सहल बजेटमध्ये! 'या' ५ देशांमध्ये भारतीय रुपया आहे मजबूत; कमी खर्चात करा परदेशवारी
15
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
16
बिहारमध्ये एनडीएला मोठा धक्का! मतदानाच्या तोंडावर भाजप आमदाराने राजदमध्ये प्रवेश केला; नाराज का झाला...
17
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
18
चिंताजनक! शेजारच्या देशात जीवघेण्या आजाराचं थैमान; २९२ जणांचा मृत्यू, भारतासाठी धोक्याची घंटा
19
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
20
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'

"सर, प्लीज मला प्रेयसीपासून वाचवा, ती माझ्याशी लग्न करतही नाही आणि दुसरीसोबतही करून देत नाही"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 15:08 IST

मध्य प्रदेशातील शहडोल येथून एक अनोखी घटना समोर आली आहे.

शहडोल : मध्य प्रदेशातील शहडोल येथून एक अनोखी घटना समोर आली आहे. इथे प्रेयसीला कंटाळून प्रियकराने आपल्या कुटुंबीयांसह पोलीस ठाणे गाठले आहे. सर मला माझ्या प्रेयसीपासून वाचवा, अशी विनंती त्याने पोलिसांकडे केली आहे. तसेच ती मला कुणाशीही लग्न करू देत नाही आणि माझ्याशी लग्न देखील करत नाही. माझ्या घरच्यांनी मोठ्या कष्टाने माझे लग्न ठरवले होते, जे प्रेयसीने मोडले असल्याचे या तरूणाने म्हटले आहे.

दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण शहडोल जिल्ह्यातील बेओहारी पोलीस ठाण्याच्या परिसरातील आहे. येथील 22 वर्षीय तरूणाने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली आहे. त्याने आपल्या प्रेमकथेची समस्या पोलीस ठाण्यात सांगितली. मागील 4 वर्षांपासून एका तरुणीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याचे त्याने तक्रार अर्जात म्हटले आहे. ती मुलगीही याच पोलीस स्टेशन परिसरात राहते. दोघेही भाड्याच्या खोलीत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत आहेत. मुलगी त्याच्यासोबत बायकोसारखी राहते. पण ती तिच्या घरीही येत राहते.

प्रेयसीविरोधात तरूणाची पोलिसांत धाव तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, मागील अनेक वर्षांपासून तो त्याच्या प्रेयसीला सामाजिक रितीरिवाजांनुसार लग्न करण्यास सांगत आहे. पण ती नेहमीच याबाबत टाळाटाळ करते. 4 वर्षांनंतरही ती माझ्याशी लग्न करण्यास तयार झाली नाही, तेव्हा माझ्या कुटुंबीयांनी माझे दुसऱ्या मुलीशी लग्न लावून देण्याचे आमिष दाखवले. दोन्ही पक्षांनी लग्नाची सर्व तयारी पूर्ण केली होती. पण लग्नाच्या शेवटच्या क्षणी माझी प्रेयसी या लग्नाच्या आड आली आणि माझे लग्न मोडले. 

"ती मला लग्न करू देत नाही, सिंगलच ठेवायचं आहे"  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न मोडल्यामुळे पीडित तरूणाला आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे ज्या स्थळासोबत विवाह होणार होता त्यांना देखील रक्कम द्यावी लागत आहे. दुसरीकडे पीडित तरूणाची प्रेयसी अद्याप त्याच्याशी लग्न करायला तयार होत नाही. त्यामुळे ती मला अविवाहित का ठेवू इच्छिते हे मला कळत नाही, असे तरुणाचे म्हणणे आहे. मात्र, तरुणाच्या तक्रारीवरून बेओहरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास सुरू आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

   

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टPoliceपोलिसmarriageलग्नSocial Viralसोशल व्हायरल