शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! आईने ५ वर्षांची मुलगी आणि १८ महिन्यांच्या मुलाला पाण्यात टाकले; नंतर स्वतःही संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2022 15:25 IST

राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : राजस्थानमधील हनुमानगड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने तिच्या दोन मुलांना पाण्यात टाकून स्वत:ही जीवन संपवल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पाण्यात बुडून तिघांचाही मृत्यू झाला. घटना बिरकाली भागातील आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २६ वर्षीय हुसैनाने ५ वर्षांची मुलगी सिमरन आणि १८ महिन्यांचा मुलगा विशाल यांना सर्वप्रथम तलावात टाकले. नंतर संबंधित मुलांच्या आईने देखील तलावात उडी मारून जीवन संपवले. 

घरगुती वादातून उचलले टोकाचे पाऊल घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून तिघांचे मृतदेह तलावातून बाहेर काढले. यानंतर मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले. पोलीस उपअधीक्षक रघुवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, हुसैना या महिलेचा सात वर्षांपूर्वी विकास खान नावाच्या व्यक्तीशी विवाह झाला होता. दोघांना दोन मुलेही होती. मात्र हुसैना आणि विकास यांच्यात वारंवार वाद होत होते. घरगुती वादातून हुसैनाने हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे सांगितले जात आहे. 

तहसीलदाराने केली आत्महत्यातर, हनुमानगड भागातील जवळील ढोलपूर जिल्ह्यात एका तहसीलदाराने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी सांगितले की, ३५ वर्षीय आशाराम गुर्जर हे करौली जिल्ह्यातील मासलपूर तहसीलमध्ये तैनात होते. माहितीनुसार, गुर्जर यांचा मृतदेह बडी सदर पोलीस स्टेशन हद्दीतील गढी जखौडा गावात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. स्थानिक लोकांनी मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत पाहताच पोलिसांना घटनेची माहिती दिली. गुर्जर यांची नुकतीच अलवरहून करौली येथे बदली झाली असून पदभार स्वीकारल्यानंतर ते दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरी आले होते. सध्या मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक चौकशी करत आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Rajasthanराजस्थानDeathमृत्यूPoliceपोलिस