शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

एकतर्फी प्रेम! लग्न मोडण्यासाठी रचला कट; पीडितेचे आंघोळ करतानाचे व्हिडीओ केले viral

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2023 18:40 IST

एकतर्फी प्रेमातून कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही.

एकतर्फी प्रेमातून कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. याचाच प्रत्यय उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथून समोर आला आहे. येथील मुंढापांडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी तरुणी आंघोळ करत असताना एका तरुणाने त्याच्या मोबाईलमधून व्हिडीओ आणि फोटो काढले. यानंतर आरोपीने तिथून लांब जात कुवेत गाठले. पीडित तरूणीच्या लग्नाच्या काही दिवस आधी आरोपीने कुवेतमधूनच व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले अन् एकच खळबळ माजली. पीडितेच्या कुटुंबीयांनी आरोपीच्या नातेवाईकांकडे तक्रार केली असता त्यांनी पीडितेचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला आणि कुटुंबीयांना मारहाण केली. 

दरम्यान, पीडित मुलीच्या आईने आरोपी इंतेझार आणि त्याचे तीन भाऊ नावेद, अथर आणि परवेज यांच्यावर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत पीडितेच्या आईने सांगितले की, इंतेझारचा मुलगा महमूद याने पीडित मुलीचे आंघोळ करताना नग्न अवस्थेत फोटो काढले होते आणि व्हिडीओ बनवला होता. यानंतर आरोपी कुवेतला गेला. माझ्या मुलीचे लग्न १५ डिसेंबरला नियोजित असताना त्याने लग्न मोडण्यासाठी हे केले. 

पीडितेच्या आईने सांगितला घटनाक्रमपीडित तरूणीच्या आईने सांगितले की, आरोपीच्या या घृणास्पद कृत्याची तक्रार करण्यासाठी ती त्याच्या घरी गेली असता, व्हिडीओ व्हायरल करणाऱ्या आरोपीच्या बापाने तिला आणि तिच्या मुलाला शिवीगाळ केली, मारहाण केली आणि घरातून हाकलून दिले. सात डिसेंबर रोजी इंतेझारचा भाऊ नावेद, अतहर आणि परवेज पीडितेच्या घरात घुसले होते. त्यांनी पीडित मुलीला पळवून नेण्याचा देखील प्रयत्न केला.  

यानंतर आरोपीने तरुणीच्या होणाऱ्या पतीला अश्लील व्हिडीओ आणि फोटो पाठवून संबंध तोडण्याची धमकी दिली. पोलिसात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकी देऊन आरोपीने त्यांना धमकावले. याप्रकरणी पोलिसांनी सांगितले की, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध सुरू आहे. त्याला लवकरच अटक करण्यात येईल. कुवेतमध्ये बसलेल्या आरोपीला मुरादाबाद येथे आणण्यासाठीही प्रयत्न केले जातील.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस