शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

मृतदेह नेण्यासाठी रुग्णवाहिका मिळेना; नातेवाईकांनी खाटेवर ठेवून सुरू केला 20 किमीचा प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 13:27 IST

मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

सिंगरौली : मध्य प्रदेशातील सिंगरौली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे रूग्णवाहिका नसल्यामुळे एका कुटुंबाला वृद्ध व्यक्तीचा मृतदेह खाटेच्या साहाय्याने पायीच गावी न्यावा लागला. नातेवाईकांनी मृतदेह खाटेवर ठेवून गावाकडे जाण्चाचा मार्ग धरला. नातेवाईकांनी 20 किलोमीटरचा प्रवास पायी सुरू केला. मात्र, 5 किमीचा प्रवास झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना मदत केली. अन् पोलिसांनी मृतदेह त्यांच्या घरी वाहनातून नेला.

खाटेवर ठेवून सुरू केला 20 किमीचा प्रवास खरं तर ही घटना सिंगरौली जिल्ह्यातील सराई तहसीलशी संबंधित आहे. जिल्ह्यातील बेंदो गावात राहणारे 65 वर्षीय मनमोहन सिंग झारा या गावात आपल्या मुलीच्या घरी गेले होते. तिथेच त्यांचा आकस्मिक मृत्यू झाला. यानंतर त्यांच्या जावयाने मृतदेह घरी नेण्यासाठी रुग्णवाहिकेला फोनवरून संपर्क साधला. यावर रुग्णालयाने मृतदेह नेण्यासाठी रूग्णवाहिका देण्यास नकार दिल्याने मृताच्या नातेवाईकांनी झारा गावातून मृतदेह नेण्यासाठी खाटेचा आधार घेतला. 

दरम्यान, नातेवाईक मृतदेह खाटेवर नेऊन मृतकाच्या गावी बेंदोकडे रवाना झाले. नातेवाईकांनी मृतदेह खाटेला बांधून 20 किलोमीटरचा प्रवास सुरू केला. ते सिधी जिल्ह्यात दाखल होताच जिल्ह्यातील भुईमाड पोलीस ठाण्याच्या जवानांच्या नजरा त्यांच्यावर पडल्या. त्यांनी याबाबत स्टेशन प्रभारींना माहिती दिली. अखेर पोलिसांनी मृतदेह आपल्या वाहनात ठेवून संबंधित गावात पोहचवला. 

पोलिसांनी केली मदत भुईमाड स्टेशन प्रभारी आकाश सिंग राजपूत यांनी सांगितले की, मृताच्या नातेवाईकांनी रुग्णवाहिकेसाठी संपर्क साधला होता, परंतु त्यांना रूग्णवाहिका मिळू शकली नाही. यानंतर मृतदेह खाटेवर घेऊन ते पायी चालत मृत व्यक्तीच्या गावाकडे जात होते. आम्हाला संबंधित पोलिसांनी फोनवरून याबाबत माहिती दिली. त्यानंतर पोलीस वाहनातून मृतदेह मृताच्या घरी नेण्यात आला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

  

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशDeathमृत्यूPoliceपोलिस