शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

खेचराला जबरदस्तीने सिगारेट पाजणाऱ्याला अटक; व्हिडीओ व्हायरल होताच कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 19:12 IST

केदारनाथ येथे दोन तरूण एका खेचराला जबरदस्तीने सिगारेट पाजत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली : केदारनाथ येथे दोन तरूण एका खेचराला जबरदस्तीने सिगारेट पाजत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हिडीओ व्हायरल होताच स्थानिक सोनप्रयाग पोलिसांनी खेचर मालकाला अटक केली. ही घटना छोटी लिंचोलीजवळील थारू कॅम्प येथील असून व्हिडीओ समोर आल्यानंतर पोलिसांना याची माहिती मिळाली. भारतीय दंड संहिता आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत खेचर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये पाहायला मिळते की, दोन तरुण खेचराला जबरदस्तीने सिगारेट पाजत आहेत. व्हिडीओ समोर येताच नेटकऱ्यांनी कारवाईची मागणी केली. बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडनने देखील याला क्रूरता म्हटले. प्राणीप्रेमींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला असून प्राण्यांवरचे अत्याचार थांबवण्याची मागणी केली आहे.

 

सिगारेटमध्ये गांजा होता का याची चौकशी केली जाईल - पोलीससोनप्रयाग पोलिसांनी सांगितले की, रुद्रप्रयागमधील पोलिसांनी व्हिडीओ तपासला असून केदारनाथपासून १६ किलोमीटर अंतरावर असलेल्या छोटी लिंचोलीजवळ थारू कॅम्पमध्ये ही घटना घडल्याचे आढळले. याप्रकरणी खेचर मालक राकेश सिंह रावत याला अटक करण्यात आली आहे. राकेशविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि प्राण्यांवर क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या या सिगारेटमध्ये गांजा भरला होता की नाही, याचा तपास सुरू आहे.

टॅग्स :Uttarakhandउत्तराखंडKedarnathकेदारनाथCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDrugsअमली पदार्थArrestअटक