शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

फिरायला नेतोय सांगून 9वीतील मुलीसोबत केलं धक्कादायक कृत्य; 2 आरोपींना अटक, 1 फरार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2023 16:02 IST

छत्तीसगडमधील जगदलपूरमधून सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : छत्तीसगडमधील जगदलपूरमधून सामूहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माहितीनुसार, तीन मित्रांनी मिळून नववीच्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कारासारखी धक्कादायक घटना घडवून आणली. खरं तर आरोपी गुन्हा करून पळून गेले. बलात्काराच्या वेळी विद्यार्थिनीला कोल्ड्रिंकमध्ये दारू पाजण्यात आली होती. वैद्यकीय तपासणीनंतर विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून आरोपीच्या दोन मित्रांना अटक करण्यात आली आहे. तर एका आरोपीला पकडण्यात अद्याप पोलिसांना यश आले नाही. 

फिरायला नेण्याच्या बहाण्याने मित्राने नेलेपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थिनीला तिच्याच शाळेतील विद्यार्थ्याने फिरायला नेतो असे सांगून बोलावले होते. मात्र नियोजनानुसार त्याचे अन्य दोन मित्रही तेथे पोहोचले. तिघांनी मिळून विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कारासारखी घृणास्पद घटना घडवली. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 12 जानेवारीची आहे. विद्यार्थिनीने घरी आल्यानंतर घडलेला संपूर्ण प्रकार सांगितला. त्यानंतर पोलिसांत तक्रार करण्यात आली. वैद्यकीय तपासणीनंतर बलात्कार झाल्याचे उघड झाले. त्यानंतर तिन्ही अल्पवयीन मुलांवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे प्रकरण गांभीर्याने घेत बोधघाट पोलीस ठाण्यातील पोलिसांनी एक पथक तयार करून आरोपींचा शोध घेतला. त्यानंतर दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. मात्र, अद्याप एक आरोपी पोलिसांच्या हाती लागलेला नाही. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लवकरच तिसऱ्या आरोपीलाही अटक करण्यात येईल. पीडितेवर सध्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Chhattisgarhछत्तीसगडCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिसArrestअटक