शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

53 हजार बनावट शेतकऱ्यांनी घेतला PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ; 43 कोटींचे नुकसान, वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2023 17:54 IST

PM-Kisan Nidhi News: PM किसान सन्मान निधी योजनेचा लाभ 53 हजार बनावट शेतकऱ्यांनी घेतल्याचे उघड झाले आहे. 

नवी दिल्ली : हरयाणातील रायगड जिल्ह्यात 2 वर्षांपूर्वी 'प्रधानमंत्री किसान सन्मान निधी'च्या नावाखाली कोट्यवधी रुपयांची फसवणूक उघडकीस आली होती, त्यात सुमारे 17 हजार अपात्र शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी करून जवळपास 25 कोटींची फसवणूक केली होती. या फसवणुकीतील शेतकऱ्यांची संख्या आता 53 हजार झाली असून, त्यांच्याकडून सुमारे 43 कोटी रुपये वसूल करायचे आहेत. अशा स्थितीत कृषी विभाग आता बनावट शेतकऱ्यांची यादी तयार करून महसूल विभागाकडून जमा करण्याचा प्रयत्न करत आहे.

दरम्यान, PM किसान सन्मान निधी योजना ही केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी योजनेपैकी एक आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यात तीन हप्त्यांमध्ये दरवर्षी 6 हजार रुपये पाठवले जातात. शेतकऱ्यांना अतिरिक्त लाभ मिळावा हा या योजनेचा उद्देश होता. योजनेच्या सुरुवातीला अपात्र शेतकऱ्यांना पात्र ठरविताना त्यांची ऑनलाइन माध्यमातून नोंदणी करण्यात आली. अशा प्रकारे अपात्र शेतकऱ्यांच्या खात्यात मोठी रक्कम जमा करण्यात आली. ही बाब जिल्हा प्रशासनाला कळेपर्यंत जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीचे क्षेत्रफळ आणि चुकीच्या मोबाईल क्रमांकाची नोंदणी करून किसान सन्मान निधीचे पैसे त्यांच्या खात्यात जमा झाले होते. त्यानंतर कृषी विभाग त्या क्षेत्राची पडताळणी करून आधार लिंकच्या माध्यमातून अधिक माहिती घेत आहे. 

बनावट शेतकऱ्यांनी उचलला फायदा यानंतर हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आले आणि आता सुमारे 43 कोटींची रक्कम 53 हजार अपात्र शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे. सर्वाधिक शेतकरी (23 हजार 379) पुसौर ब्लॉकमधील असल्याचे समोर आले आहे. मात्र, मागील दोन वर्षांत विभागाला शेतकऱ्यांकडून केवळ 12 लाख रुपयेच वसूल करता आले आहेत. कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, यापूर्वी ऑनलाइन नोंदणीमुळे अपात्र शेतकरी देखील योजनेंतर्गत पात्र ठरले आणि त्याचा लाभ घेतला, ज्यांची वसुली शासनाकडून केली जात आहे. यासाठी पटवारी व महसूल विभागाकडून घरोघरी जाऊन लोकांकडून पैसे वसूल करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

बनावट शेतकऱ्यांची आकडेवारी

  • रायगड ब्लॉकमध्ये 836 शेतकरी, ज्यांच्याकडे 1 कोटी 16 लाख 6 हजार एवढी रक्कम. 
  • खरसिया ब्लॉकमध्ये 3507 शेतकरी असून त्यांच्याकडे 4 कोटी 32 लाख 64 हजार रूपये आहेत. 
  • तमनार ब्लॉकमध्ये 995 शेतकरी, ज्यांच्याकडे 1 कोटी 41 लाख 50 हजार एवढी रक्कम आहे. 
  • पुसौरमध्ये सर्वाधिक 23379 शेतकरी असून 12 कोटी 38 लाख 38 हजार एवढी रक्कम आहे. 
  • घरघोडा ब्लॉकमधील 93 शेतकरी, ज्यांच्याकडे 12 लाख 26 हजार रक्कम आहे.
  • लैलुंगा ब्लॉकमधील 786 शेतकरी, ज्यांच्याकडे 13 कोटी 40 लाख 2 हजार एवढी रक्कम आहे. 
  • धरमजाईगड ब्लॉकमधील 9890 शेतकरी आहेत, ज्यांच्याकडून 58 लाख 38 हजार एवढी रक्कम वसूल करायची आहे. 
  • बर्माकेला ब्लॉकमधील 3999 शेतकरी, ज्यांच्याकडे 2 कोटी 6 लाख 8 हजार एवढी रक्कम आहे. 
  • सारंगढ ब्लॉकमधील 9752 शेतकरी, ज्यांच्याकडून 7 कोटी 86 लाख 48 हजार वसूल करायचे आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :HaryanaहरयाणाPM Kisan Schemeप्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाFarmerशेतकरीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी