शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 16 व्या वर्षी प्रेमात अन् 26 व्या वर्षी गरोदर; 'गर्भपात' करून प्रियकर झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 11:03 IST

Love and Betrayal: मध्य प्रदेशातील ग्वालियर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 

नवी दिल्ली : मध्य प्रदेशातीलग्वालियर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने गेस्ट हाऊसमध्ये बोलावून बलात्कार केला असल्याचा आरोप येथील पीडित महिलेने केला आहे. त्यानंतर मागील 10 वर्षे तो लग्नाच्या बहाण्याने तिचे शोषण करत होता. पीडितेने आपण गर्भवती असल्याचे तिच्या प्रियकराला सांगितल्यावर तरुणाला धक्का बसला. महिलेचा आरोप आहे की, जेव्हा तिने प्रियकरावर लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा त्याने धक्कादायक कृत्य करत तिचा गर्भपात केला. या प्रकरणी पीडित तरुणीने इंदरगंज पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी आरोपी प्रियकरावर बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे.

माहितीनुसार, ग्वालियर येथील छप्पर वाला पुल परिसरात राहणाऱ्या 26 वर्षीय तरुणीने इंदरगंज पोलीस ठाण्यात FIR दाखल केला आहे. पीडितेची 10 वर्षांपूर्वी डीडी नगर भागात राहणाऱ्या रोहित जदौन नावाच्या तरुणाशी ओळख झाली होती. दोघांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. एक दिवस रोहितने मुलीला गेस्ट हाऊसमध्ये बोलावून तिथे तिच्यावर बलात्कार केला असा आरोप तिने केला. मुलीने विरोध केल्यावर रोहितने तिला लग्नाचे आमिष दाखवले असेही पीडितीने सांगितले. यादरम्यान रोहितने लग्नाच्या नावाखाली 10 वर्षे तिचे शोषण सुरूच ठेवले, मात्र लग्न केले नाही. काही दिवसांपूर्वी मुलगी गरोदर राहिली. तिने रोहितला हा प्रकार सांगितला आणि लग्नासाठी दबाव टाकला तेव्हा रोहितने त्याच्या अन्य मैत्रिणीसोबत तिला गोळी खाऊ घातली, त्यामुळे तिचा गर्भपात झाला. 

प्रियकराविरोधात गुन्हा दाखल दरम्यान, रोहितने तिचा गर्भपात केला असल्याचे पीडित महिलेने सांगितले. लक्षणीय बाब म्हणजे यानंतर देखील ती आरोपीसोबत राहण्यास तयार होती. मात्र, तिने लग्नासाठी दबाव टाकला असता रोहितनेही लग्नास नकार दिला. अखेर नाराज होऊन तरुणीने इंदरगंज पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. पोलिसांनी तरुणीसोबतचे फोटो, चॅट आणि इतर पुराव्याच्या आधारे आरोपी रोहितविरुद्ध बलात्कारासह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. इंदरगंज सर्कलचे सीएसपी विजय सिंह भदौरिया यांनी सांगितले की, मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी एफआयआर नोंदवला आहे. आरोपीचा शोध सुरू आहे. लवकरच त्याला अटक करण्यात येईल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशgwalior-pcग्वालियरCrime Newsगुन्हेगारीsexual harassmentलैंगिक छळPoliceपोलिस