आरारा खतरनाक! आता कुत्र्यांसाठीही बनवलं जातंय जात प्रमाणपत्र; अर्ज पाहून अधिकारी अवाक्

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 06:54 PM2023-02-03T18:54:51+5:302023-02-03T18:55:18+5:30

बिहारच्या गयामध्ये एका व्यक्तीने कुत्र्याच्या जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केला आहे.

In Gaya, Bihar, a person has applied online for dog breed certificate   | आरारा खतरनाक! आता कुत्र्यांसाठीही बनवलं जातंय जात प्रमाणपत्र; अर्ज पाहून अधिकारी अवाक्

आरारा खतरनाक! आता कुत्र्यांसाठीही बनवलं जातंय जात प्रमाणपत्र; अर्ज पाहून अधिकारी अवाक्

googlenewsNext

गया : बिहारच्या गयामध्ये एका व्यक्तीने कुत्र्याच्या जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केला आहे. हे पाहून स्थानिक अधिकाऱ्यांना देखील धक्का बसला. खरं तर ही घटना गया जिल्ह्यातील गुरुरु झोनल कार्यालयातील आहे. इथे कुत्र्याच्या नावाने जातीचा दाखला मिळवण्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यात आला आहे. या अर्जात अर्जदाराचे नाव- टॉमी, वडिलांचे नाव- शेरू, आईचे नाव- गिनी, गाव- पांडेपोखर, ग्रामपंचायत- रौना, प्रभाग क्रमांक-13 असा उल्लेख करण्यात आला आहे. त्याचबरोबर कुत्र्याचा आधार कार्ड क्रमांक 993460458271 टाकण्यात आला आहे. लक्षणीय बाब म्हणजे आधार कार्ड देखील अपलोड केले आहे.
 
दरम्यान, अर्जात 993460****  असा मोबाईल क्रमांकही नमूद आहे. व्यवसाय- विद्यार्थी, जन्मतारीख- 14/4/2022 अशी लिहिली आहे. अर्ज क्रमांक आहे, BCCCO/2023/314491. या अर्जात स्वत:चे प्रतिज्ञापत्रही देण्यात आले आहे. विशेष बाब म्हणजे हा अर्ज स्वीकारण्यात आला आहे. आधार कार्डवर कुत्र्याचा फोटोही चिकटवला आहे. हे प्रकरण समोर आल्यानंतर कार्यालयात खळबळ उडाली असून अर्जदाराचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. 

खोडसाळपणा केला असल्याची अधिकाऱ्यांना शंका
या संदर्भात गुरुरु ब्लॉकचे ऑफिसर संजीव कुमार त्रिवेदी यांनी सांगितले की, दिलेल्या मोबाईल नंबरवर डायल केल्यास ट्रूकॉलरवर राजा बाबू गुरुरू यांचे नाव येत आहे. विभाग याला कोणाचा तरी खोडसाळपणा मानत आहे. ते म्हणाले की, एकीकडे सरकार ऑनलाइन सुविधा देत आहे. तर दुसरीकडे उपद्रवी घटक याच्याशी गैरप्रकार करत आहेत. गैरप्रकार करणाऱ्यांची लवकरच ओळख पटल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी अधिक म्हटले. बिहारमध्ये सध्या जातीय जनगणना सुरू आहे. यादरम्यान गया येथील कुत्रेही आपली जात प्रमाणपत्र काढण्यासाठी सरकारी कार्यालयात अर्ज करत आहेत. मात्र, हा काही लोकांचा खोडसाळपणा असून त्यांनी टॉमीच्या नावाने मंडळ कार्यालयात जात प्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज केला आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

Web Title: In Gaya, Bihar, a person has applied online for dog breed certificate  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.