शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

'ड्राय स्टेट' गुजरातमध्ये भाजप नेता 'झिंगाट', व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर द्यावा लागला राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2022 21:13 IST

भाजपशासित गुजरातमध्ये दारुबंदी आहे, पण भाजप नेताच दारुच्या नशेत असल्याचे आढळून आले.

अहमदाबाद: गुजरातला ड्राय स्टेट म्हटले जाते, म्हणजेच राज्यात कुठेही दारू विकण्यास परवानगी नाही. पण, अवैधरित्या राज्यभर दारुची विक्री होत असते. यातच गुजरातच्या एका भाजप नेत्याचा कथितरित्या दारू पिऊन कार्यक्रमात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यावर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने प्रश्न उपस्थित केल्यावर भाजप नेत्याला राजीनामा द्यावा लागला. 

मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण छोटा उदयपूरचे भाजपा जिल्हाध्यक्ष रश्मीकांत वसावा यांच्याशी संबंधित आहे. द्रौपदी मुर्मू यांची राष्ट्रपतीपदी निवड झाल्याबद्दल कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. द्रौपदी मुर्मू आदिवासी समुदायातून येतात आणि गुजरातचा हा भाग आदिवासीबहुल क्षेत्र आहे. या कार्यक्रमाला भाजपच्या मंत्री निमिषा सुथारही उपस्थित होत्या. यावेळी रमाकांत वसावा दारुच्या नशेत कार्यक्रमात सामील झाले.

काँग्रेस-आपचे टीकास्त्रगुजरातमध्ये दारुबंदी आहे आणि अशातच छोटा उदयपूरच्या भाजप जिल्हाध्यक्षाचा मद्यधुंद अवस्थेतील व्हिडिओ समोर आल्यानंतर काँग्रेस आणि आम आदमी पक्षाने प्रश्न उपस्थित केले आहेत. गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष जगदीश ठाकोर यांनीही रश्मीकांत वसावा यांचा व्हिडिओ शेअर केला आहे. सोबत लिहिले- 'छोटा उदयपूरचे भाजप जिल्हाध्यक्ष गुजरातमधील दारुबंदीचे वास्तव सांगत आहेत. ही भाजप सरकारची दारूबंदी आहे का? दारूबंदी फक्त कागदावरच अस्तित्वात आहे.'

वसावा यांचा राजीनामा रमाकांत वसावा यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. आपल्या राजीनाम्यात वसावा यांनी लिहिले आहे की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील यांनी राजीनामा देण्यास सांगितले, त्यामुळे ते पक्षाचा राजीनामा देत आहेत. मात्र, या व्हिडिओनंतर गुजरातमधील दारुबंदीच्या वास्तवावर पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

टॅग्स :Gujaratगुजरातliquor banदारूबंदीBJPभाजपा