शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! "हुंड्यात हवे होते महागडे जॅकेट...", सासरकडून न मिळाल्याने पत्नीला जागीच संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2023 11:38 IST

बिहारमधील वैशाली जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली : देशभरातील अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी आहे. बिहारमध्ये देखील थंडीचा पारा चढला आहे. अशा परिस्थितीत जॅकेटची मागणीही झपाट्याने वाढली आहे. पण, बिहारमधील छपरामधून जॅकेटवरून एक धक्कादायक घटना घडली आहे. खरं तर वैशाली जिल्ह्यातील विवाहित तरूणाने जॅकेटची मागणी पूर्ण न केल्याने पत्नीची हत्या केली. रितिका कुमारी असे मृत महिलेचे नाव असून ती छपराच्या मुफसिल पोलीस स्टेशन हद्दीतील मंगाईडीह गावातील रहिवासी होती. 

जॅकेट न मिळाल्याने केली हत्या दरम्यान, वैशाली जिल्ह्यातील देसरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कालीचरण सिंग याच्यासोबत 8 महिन्यांपूर्वी रितिकाचे लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून हुंड्याची मागणी करून रितिकाचा छळ होत असल्याचा आरोप मृत रितीकाच्या नातेवाईकांनी केला आहे. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रितिकाच्या हत्येपूर्वी दोन दिवस आधी जॅकेटसाठी तिचा छळ करण्यात आला होता, याची माहिती तिने आईला दिली होती. 

याप्रकरणी वैशाली जिल्ह्यातील देसरी पोलीस ठाण्यात सासरच्या मंडळींविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. दाखल करण्यात आलेल्या एफआयआरमध्ये मृत रितीकाची आई आणि मुफसिल पोलीस स्टेशन परिसरातील मगईडीह गावातील रहिवासी असलेल्या अनिता देवी यांनी सांगितले की, त्यांनी 2 मे 2022 रोजी आपल्या मुलीचे लग्न भोला सिंगचा मुलगा कालीचरण सिंग याच्याशी हिंदू रितीरिवाजांनुसार केले.  

आरोपीला अटक नातेवाईकांच्या म्हणण्यानुसार, लग्न झाल्यापासून त्यांच्या मुलीचा चारचाकी व इतर सामानासाठी छळ केला जात होता. मुलगी माहेरी पोहोचू नये म्हणून मोबाईलचा सिम क्रमांकही बदलण्यात आला. 7 महिन्यांनी म्हणजे 2 जानेवारी 2023 रोजी सकाळी साडेसात वाजता अचानक सासरच्यांनी फोन करून सांगितले की, तुमच्या मुलीची तब्येत बिघडली आहे, त्यामुळे लवकर या. मात्र, जावई म्हणजेच आरोपी कालीचरण आणि त्याच्या घरातील इतर सदस्यांनी मिळून तिची हत्या केली होती. शरीरावरील डाग पाहून मृत महिलेच्या नातेवाईकांनी पोलिसांना माहिती दिली असता सत्य समोर आले. आरोपी कालीचरण सिंगला अटक करण्यात आली असून इतर 3 आरोपींची चौकशी केली जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

 

टॅग्स :BiharबिहारCrime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूPoliceपोलिसdowryहुंडा