शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

बिहारमध्ये आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करणार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांचा प्रस्ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 07:10 IST

केंद्र सरकारने बिहारला विशेष राज्याचा दर्जा दिला तर हे उद्दिष्ट आणखी कमी कालावधीत पूर्ण होईल, असेही नितीशकुमार यांनी म्हटले आहे.

- एस. पी. सिन्हा

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी मंगळवारी विधानसभेत राज्यातील आरक्षणाची मर्यादा ७५ टक्के करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या अंतर्गत त्यांनी विद्यमान आरक्षणाची मर्यादा ५० वरून ६५ करण्याची सूचना केली आहे. जातीय सर्वेक्षणानंतर मागास, अतिमागास, एससी, एसटी लोकसंख्येच्या आकडेवारीवरून आरक्षण वाढविण्याची गरज आहे. त्यामुळे ५० टक्के आरक्षण ६५ टक्के करावे. आधीच उच्च जातींना १० टक्के आरक्षण आहे. या ६५ टक्क्यानंतर एकूण आरक्षण ७५ टक्के होईल.  याबाबत योग्य तो विचारविनिमय करून निर्णय घेऊ. विधानसभेच्या याच अधिवेशनात प्रस्ताव मांडण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

गरिबांना २ लाखांची आर्थिक मदतबिहारमध्ये ९४ लाखापेक्षा अधिक कुटुंबांचे मासिक उत्पन्न ६ हजार रुपयांपर्यंत आहे, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी २ लाखांच्या मदतीचा प्रस्ताव आहे.राज्यात ६३,८५० कुटुंबांना राहण्यासाठी घरे नाहीत. अशा कुटुंबांना जमीन घेण्यासाठी १ लाख व बांधकामासाठी १.२० लाख रुपये देण्याचा विचार आहे. यावर एकूण २ लाख ५० हजार कोटी रुपयांचा खर्च येईल. पुढील पाच वर्षांत हे उद्दिष्ट साध्य करण्यात येईल. यासाठी प्रत्येक वर्षी ५० हजार कोटी रुपये खर्च येईल. केंद्र सरकारने बिहारला विशेष राज्याचा दर्जा दिला तर हे उद्दिष्ट आणखी कमी कालावधीत पूर्ण होईल, असेही नितीशकुमार यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारBiharबिहारreservationआरक्षण