मद्यधुंद नवरदेव स्वत:च्या लग्नात जाण्याचे विसरला; नवरीचा विवाहास नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2023 08:55 IST2023-03-17T08:55:13+5:302023-03-17T08:55:38+5:30

लग्नासाठी झालेला खर्च परत मिळण्यासाठी नवरदेवालाच बांधून ठेवले

in bihar drunken husband forgot to attend his own wedding bridegroom refusal of marriage | मद्यधुंद नवरदेव स्वत:च्या लग्नात जाण्याचे विसरला; नवरीचा विवाहास नकार

मद्यधुंद नवरदेव स्वत:च्या लग्नात जाण्याचे विसरला; नवरीचा विवाहास नकार

एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : मद्यधुंद नवरदेव आपल्याच लग्नात जाण्याचे विसरल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकाराने धक्का बसलेल्या नवरीने विवाहास नकार तर दिलाच, परंतु लग्नासाठी झालेला खर्चही वसूल केला.

बिहारच्या भागलपूर जिल्ह्यात हा प्रकार घडला. कहलगावहून नवरदेवाला सुलतानगंज येथे आपल्याच विवाहासाठी जायचे होते. परंतु, त्याने एवढी दारू ढोसली की लग्नाला जाण्याचेच तो विसरला, तर दुसरीकडे नवरीकडील लोकांनी लग्नाची सर्व तयारी करून ठेवली होती. दारूची नशा उतरल्यावर हे महाशय विवाह मंडपात दाखल झाले.

नवरदेवाला बांधून ठेवले

या प्रकाराची माहिती मिळताच नवरीने व्यसनी नवरदेवाशी लग्न न करण्याचा निर्णय जाहीर केला. एवढेच नव्हे तर लग्नासाठी झालेला खर्च परत द्यावा, यासाठी आग्रह धरला. तिच्या कुटुंबीयांनी न होणाऱ्या नवरदेवाला व त्याच्या कुटुंबीयांना या मागणीसाठी बांधून ठेवले. अखेर काहीजण नवरदेवाच्या गावी जाऊन रक्कम घेऊन येण्यासाठी गेले. पोलिसांनाही याची माहिती देण्यात आली. अखेर पैसे देण्याच्या बोलीवर नवरदेवाला व त्याच्या कुटुंबीयांना सोडून देण्यात आले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: in bihar drunken husband forgot to attend his own wedding bridegroom refusal of marriage

टॅग्स :Biharबिहार