शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

गेमच्या नादात प्रियकराने गमावले पैसे! प्रेयसीने रचला अपहरणाचा कट; घरच्यांकडून १० लाख मागितले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2024 15:15 IST

ऑनलाईन गेमच्या नादात प्रियकराने पैसे गमावल्यानंतर प्रेयसीने असा कट रचला की पोलिसांनाही धक्का बसला.

प्रेमाला सीमा नाही आणि प्रेमात कोण कोणत्या थराला जाईल याची कल्पनाही केली जाऊ शकत नाही, असे बोलले जाते. ऑनलाईन गेमच्या नादात प्रियकराने पैसे गमावल्यानंतर प्रेयसीने असा कट रचला की पोलिसांनाही धक्का बसला. पैशांचे नुकसान भरून काढण्यासाठी संबंधित प्रेयसीने स्वतःच्या अपहरणाचा कट रचला. तिने अपहरणाचा कट रचून तिच्याच घरच्यांकडून १० लाख रूपये मागितले. बिहारच्या भागलपूर येथील या घटनेने सर्वांचे लक्ष वेधले.

भागलपूर येथील अशोक रजक या व्यक्तीने २० जानेवारी रोजी स्थानिक नवगचिया पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांनी तक्रारीत सांगितले की, त्यांची भाची नेहा कुमारी सकाळी १० वाजता कॉलेजला गेली पण संध्याकाळी ७ वाजेपर्यंत घरी परतली नाही. कॉलेज आणि कोचिंगमधूनही नेहाची माहिती मिळाली नाही. अचानक २१ जानेवारीला नेहाच्या मोबाईलवरून तिच्या मामाच्या नंबरवर फोन आला. त्यांनी नेहा त्यांच्या ताब्यात असल्याचे सांगितले. १० लाखांची खंडणी दिल्यानंतर तिची सुटका करू अशी धमकी देण्यात आली.

प्रेयसीने रचला अपहरणाचा कटअपहरणाच्या घटनेची माहिती मिळताच एसपी सुशांत कुमार सरोज यांनी तातडीने तक्रार नोंदवली आणि तपास सुरू केला. मोबाईल लोकेशन आणि कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींच्या संभाव्य अड्ड्यावर छापे टाकले. मग अपहरणकर्त्यांनी मुलीला भागलपूरमध्ये लपवून ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. पोलिसांनी मुलीला भागलपूरमधील एका लॉजमधून ताब्यात घेतले. यासोबतच अपहरण करणाऱ्या तीन मुलांनाही अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले तीन तरुण नवगचिया येथील श्रीपूर येथील रहिवासी आहेत. आरोपींमध्ये आयुष कुमार, गौरव कुमार आणि तिसरा एक अल्पवयीन आहे.

कॉलेजमध्ये झाले प्रेम पोलिसांनी चौकशी केल्यानंतर नेहा कुमारीने सर्व प्रकरणाची माहिती दिली. तिने सांगितले की, ती कॉलेजमध्ये शिक्षण घेत असून वर्गातील आशिष कुमार नावाच्या मुलाशी तिचे प्रेमसंबंध आहेत. तसेच आशिष कुमार आणि आशिषच्या अटक केलेल्या दोन्ही मित्रांनी सांगितले की, आशिष ऑनलाइन गेमिंगमध्ये खूप रमला होता. त्याने मोठी रक्कम गुंतवली पण त्याच्या हाती काहीच लागले नाही. 

दरम्यान, २० तारखेला कॉलेजला जाण्याच्या बहाण्याने नेहा प्रियकर आशिषसोबत भागलपूरला गेली. ती आशिषचा मित्र आयुषच्या मैत्रिणीच्या लॉजमध्ये लपली आणि तिथून तिने तिच्या मोबाईलवरून आजोबा अशोक रजक यांना फोन करून प्रियकर आशिषशी बोलायला लावले. नेहाला सोडवण्यासाठी आशिषने १० लाख रुपयांची खंडणी मागितली. मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी लॉजमधून नेहाला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :BiharबिहारLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्टCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस