जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा

By Admin | Updated: November 5, 2016 00:04 IST2016-11-05T00:04:40+5:302016-11-05T00:04:40+5:30

गेल्या दोन महिन्यांपासून आजारी असलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे.

Improvement in Jayalalitha's health | जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा

जयललिता यांच्या प्रकृतीत सुधारणा

>ऑनलाइन लोकमत 
चेन्नई, दि. 4 - गेल्या दोन महिन्यांपासून आजारी असलेल्या तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. चेन्नईतील अपोलो रुग्णालयाचे फाऊंडर डॉक्टर प्रताप रेड्डी यांनी दिली. 
"जयललिता या आता उपचारांना उत्तम प्रतिसाद देत असून, त्यांच्यावर औषधांचा चांगला परिणाम दिसून येत आहे. तसेच त्यांनी बोलण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे त्यांना लवकरच सीसीयूमधून प्रायव्हेट वॉर्डमध्ये हलवण्यात येणार आहे," असे प्रताप रेड्डी यांनी सांगितले. 
अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार जयललिता यांना सामान्य जीवन जगण्यास सुरुवात केली आहे.  तसेच एआयडीएमके चे जेष्ठ नेते सी. पोयनाड यांनी सांगितले की " आता जयललिता यांच्या फुफ्फुसात झालेला संसर्ग नियंत्रणात असून, त्यांची प्रकृती गंभीर स्थितीतून बाहेर आली आहे."जयललिता यांना 22 सप्टेंबर रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेव्हापासून त्यांच्या प्रकृतीबाबत तर्कवितर्क सुरू आहेत.  
 

Web Title: Improvement in Jayalalitha's health