सुधारित-पंढरपूर राहुट्या

By Admin | Updated: January 31, 2015 00:34 IST2015-01-31T00:34:37+5:302015-01-31T00:34:37+5:30

चंद्रभागेतील राहुट्यांना

Improved-Pandharpur resident | सुधारित-पंढरपूर राहुट्या

सुधारित-पंढरपूर राहुट्या

द्रभागेतील राहुट्यांना
कोर्टाचा तूर्त दिलासा
मुंबई : पंढरपूरमधील माघी यात्रेसाठी चंद्रभागा नदीच्या पात्रातील वाळवंटात उभारलेल्या राहुट्यांना उच्च न्यायालयाने शुक्रवारी तात्पुरते अभय दिले़ मात्र यापुढे नदीत राहुट्या उभारणार नाही, अशी हमी संबंधितांकडून घ्या, असे आदेश न्यायालयाने शासनाला दिले़
चंद्रभागा प्रदूषित होत असल्याने न्यायालयाने गेल्या महिन्यात येथे वाहने धुण्यापासून तर नदीत घाण करणार्‍यांपर्यंत सर्वांवरच कडक निर्बंध आणले आहेत़ मात्र आता येथे होणार्‍या कार्यक्रमांसाठी नदी पात्रात राहुट्या उभारण्यात आल्या आहेत़
राहुट्या हटविताना कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो़ त्यामुळे माघी यात्रेसाठी तात्पुरत्या उभारलेल्या राहुट्या जैसे थे राहू द्या, अशी विनंती मुख्य सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी न्या़ अभय ओक यांच्या खंडपीठाला केली़ ती ग्राह्य धरत न्यायालयाने उपरोक्त आदेश दिले व सुनावणी तहकूब केली़ (प्रतिनिधी)

Web Title: Improved-Pandharpur resident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.