सुधारित इसिसवर भारतात प्रतिबंध - राजनाथसिंग
By Admin | Updated: December 16, 2014 23:44 IST2014-12-16T23:44:13+5:302014-12-16T23:44:13+5:30
नवी दिल्ली : इस्लामिक स्टेट ऑफ इराक ॲण्ड सिरिया अर्थात इसिसला समर्थन देणारे टिष्ट्वटर खाते चालविण्याचा आरोप असलेल्या बेंगळुरूच्या मेहदी मसरूर विश्वास याला अलीकडे अटक करण्यात आली असतानाच, इसिसवर बंदी घालण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी मंगळवारी लोकसभेत दिली़

सुधारित इसिसवर भारतात प्रतिबंध - राजनाथसिंग
न ी दिल्ली : इस्लामिक स्टेट ऑफ इराक ॲण्ड सिरिया अर्थात इसिसला समर्थन देणारे टिष्ट्वटर खाते चालविण्याचा आरोप असलेल्या बेंगळुरूच्या मेहदी मसरूर विश्वास याला अलीकडे अटक करण्यात आली असतानाच, इसिसवर बंदी घालण्यात आल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी मंगळवारी लोकसभेत दिली़लोकसभेत मुल्लपल्ली रामचंद्रन आणि अन्य सदस्यांच्या पुरवणी प्रश्नाच्या उत्तरादाखल राजनाथ यांनी ही माहिती दिली़ भारतात इसिसच्या कारवायांना लगाम लावण्यासाठी प्रभावी पावले उचलण्यात येत आहे़ या कुख्यात संघटनेवर देशात बंदी घालण्यात आली आहे़ बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक दुरुस्ती कायदा आणि संयुक्त राष्ट्रांतर्गत प्रतिबंधित दहशतवादी संघटनांच्या यादीत असलेल्या संघटनांतर्गत ही बंदी लादण्यात आली आहे, असे त्यांनी सांगितले़ जगातील अनेक भागात इसिसचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन भारताने हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले़आजघडीला भारतात इसिसचा प्रभाव नगण्य आहे आणि अल्पसंख्यक समुदायाचे पालक आपल्या मुलांना या संघटनेप्रति सतर्क करीत आहेत, हे कौतुकास्पद आहे, असेही ते म्हणाले़