सुधारित महत्त्वाचे -सत्तार यांना पशुसंवर्धन, तर मधुकर चव्हाणांकडे परिवहन

By Admin | Updated: June 7, 2014 00:36 IST2014-06-07T00:36:01+5:302014-06-07T00:36:01+5:30

सत्तार यांना पशुसंवर्धन, तर मधुकर चव्हाणांकडे परिवहन

Improved important - animal husbandry to animal husbandry, transport to Madhukar Chavan | सुधारित महत्त्वाचे -सत्तार यांना पशुसंवर्धन, तर मधुकर चव्हाणांकडे परिवहन

सुधारित महत्त्वाचे -सत्तार यांना पशुसंवर्धन, तर मधुकर चव्हाणांकडे परिवहन

्तार यांना पशुसंवर्धन, तर मधुकर चव्हाणांकडे परिवहन
अमित देशमुख यांच्या उत्पादन शुल्क, अन्न व औषधी प्रशासन
मुंबई : मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दोन नवीन मंत्र्यांना खाती बहाल करत इतर काही मंत्र्यांच्या खात्यात बदल केले आहेत़ त्यानुसार नवे कॅबिनेट मंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे पशुसंवर्धन , दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय हे खाते देण्यात आले असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले़ आतापर्यंत हे खाते मधुकर चव्हाण यांच्याकडे होते़ आता त्यांच्याकडे परिवहन खाते देण्यात आले आहे़ आतापर्यंत परिवहन खाते हे स्वत: मुख्यमंत्र्यांकडे होते़ नवे राज्यमंत्री अमित देशमुख यांच्याकडे उत्पादन शुल्क, अन्न व औषधी प्रशासन आणि पर्यटन ही खाती देण्यात आली आहेत़ यापूर्वी उत्पादन शुल्क खाते राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांच्याकडे होते़ त्यांच्याकडे आता ऊर्जा, वित्त व नियोजन, जलसंपदा आणि संसदीय कामकाज या खात्यांचे राज्यमंत्री राहील़ सतेज पाटील यांच्याकडे गृह, ग्रामविकास व फलोत्पादन ही तीन खाती कायम राहतील़ राज्यमंत्री रणजीत कांबळे यांच्याकडे पाणीपुरवठा आणि अन्न व नागरी पुरवठा ही कायम खाती कायम राहतील़ मात्र, त्यांच्याकडील पर्यटन खाते अमित देशमुखांकडे देण्यात आले आहे़
राजेंद्र मुळक आणि सतेज पाटील हे दोघेही मुख्यमंत्री चव्हाण यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात़ तसेच रणजीत कांबळे यांचेही मुख्यमंत्र्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आहेत़ अमित देशमुखांना खाती देताना आपल्या जवळच्या राज्यमंत्र्यांची खाती दिली आहेत़ आपल्याकडील परिवहन खाते मुधकर चव्हाण यांना देऊन त्यांनी निवडणुकीच्या चार महिने आधी का होईना पण त्यांना महत्त्वाचे खाते दिल़े़ (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Improved important - animal husbandry to animal husbandry, transport to Madhukar Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.