शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
3
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
4
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
5
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
8
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
9
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
10
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
11
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
12
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
13
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
14
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
15
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

महत्वाची बातमी पान २ : प्रतिज्ञापत्राचे नमुने

By admin | Published: April 11, 2015 1:40 AM

प्रतिज्ञापत्राचे नमुने आता मामलेदार कार्यालयातच उपलब्ध

प्रतिज्ञापत्राचे नमुने आता मामलेदार कार्यालयातच उपलब्ध
सासष्टीत सेवा सुरू : लोक वकील व एजंटाच्या भुर्दंडापासून मुक्त
मडगाव : प्रशासनाचा फायदा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावा, या उद्देशाने दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने सुप्रशासनाचे एक चांगले उदाहरण घालून दिले आहे. विविध दाखले घेण्यासाठी लोकांना जे प्रतिज्ञापत्र भरून द्यावे लागते त्याचे विहित नमुने आता मामलेदार कार्यालयातच उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे लोकांना आता प्रतिज्ञापत्र लिहून घेण्यासाठी वकिलाकडे किंवा एजंटाकडे हेलपाटे घालण्यासाठी सुटका मिळाली आहे.
दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी सचिन शिंदे यांच्याशी या संदर्भात संपर्क साधला असता, ही योजना यापूर्वी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन यांनी उत्तर गोव्यात सुरू केली होती. यासाठी त्यांनी विविध दाखले घेण्यासाठी जे प्रतिज्ञापत्र सादर केले जाते त्याचे विहित नमुने तयार केले होते, त्याचीच अंमलबजावणी आता दक्षिण गोव्यात केली जाते, असे त्यांनी सांगितले.
या योजनेची माहिती अशी की, वेगवेगळे दाखले नेण्यासाठी जी प्रतिज्ञापत्रे लागतात त्यांचा तांत्रिक मजकूर जवळपास एकसारखाच असतो. हा मजकूर आता लिखित स्वरूपात नागरिकांना प्राप्त होणार आहे. आपली वैयक्तिक माहिती भरण्यासाठी या नमुन्यात मोकळ्या जागा सोडल्या आहेत. त्या जागा लोकांनी स्वत: भरायच्या आहेत. या अर्जावर ५0 रुपयांचा नॉन ज्युडिशियल कोर्ट फी लावून तो सादर करायचा आहे.
या पध्दतीमुळे लोकांचे वकील किंवा एजंटाकडे जाण्याचे हेलपाटे वाचतील, असे शिंदे म्हणाले. असे अर्ज तयार करून देण्यासाठी लोकांकडून २५0 ते ३00 रुपये यापूर्वी आकारले जायचे. आता हे काम निशुल्क होणार आहे. केवळ ५0 रुपयांची कोर्ट फीने आता हे काम होणार आहे, असे ते म्हणाले.
सासष्टीचे उपजिल्हाधिकारी अजित पंचवाडकर यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे शुक्रवार १0 एप्रिलपासून ही सेवा सासष्टीच्या मामलेदार कार्यालयात उपलब्ध आहे आणि त्याचा फायदा लोकांना निश्चितच होईल, असे ते म्हणाले. या कार्यालयात दिवसाकाठी अशा अर्जांसाठी किमान ४0 ते ५0 अर्ज येतात. त्या सर्वांना आता दिलासा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
सध्या मडगावात सुरू झालेली ही सेवा दक्षिण गोव्यातील इतर तालुक्यांतही पसरविली जाणार आहे. (प्रतिनिधी)