रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, केंद्रानं नियम बदलला; ग्राहकांवर होणार मोठा परिणाम
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 13:55 IST2022-05-09T13:53:07+5:302022-05-09T13:55:20+5:30
खरे तर, केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत (PMGKAY) मे ते सप्टेंबरपर्यंत वाटप करण्यात येणारा गव्हाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.

रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची बातमी, केंद्रानं नियम बदलला; ग्राहकांवर होणार मोठा परिणाम
जर आपण रेशन कार्ड धारक असाल तर, ही बातमी आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत (Pradhan Mantri Garib Kalyan Anna Yojana) गव्हाचा कोटा कमी करून तांदळाचा कोटा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. हा बदल अनेक राज्यांत आणि काही केंद्र शासित प्रदेशांत करण्यात आला आहे. यामुळे रेशन कार्ड धारकांना पूर्वीच्य तुलनेत कमी गहू मिळेल.
PMGKAY अंतर्गत 25 राज्यांच्या कोट्यात बदल नाही -
खरे तर, केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत (PMGKAY) मे ते सप्टेंबरपर्यंत वाटप करण्यात येणारा गव्हाचा कोटा कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. PMGKAY अंतर्गत बिहार, केरळ आणि उत्तर प्रदेश या तीन राज्यांना मोफत वितरणासाठी गहू दिला जाणार नाही. याशिवाय, दिल्ली, गुजरात, झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील गव्हाचा कोटा कमी करण्यात आला आहे. तर उरलेल्या 25 राज्यांच्या कोट्यात कुठल्याही प्रकारचा बदल करण्यात आलेला नाही.
गेव्हाचा घटलेला कोटा तांदळाने भरून काढणार -
केंद्राने राज्यांना दिलेल्या माहितीत म्हटले आहे, की 'मे ते सप्टेंबरपर्यंत सर्व 36 राज्ये/केंद्र शासित प्रदेशांसाठी तांदूळ आणि गव्हाच्या PMGKAY वाटपात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.' तसेच, गव्हाच्या कमी झालेल्या कोट्याची भरपाई तांदूळातून केली जाईल, असे अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाने म्हटले आहे.