(महत्त्वाचे) लिंबाबाई मुंडे यांचे निधन
By Admin | Updated: July 22, 2015 00:34 IST2015-07-22T00:34:18+5:302015-07-22T00:34:18+5:30

(महत्त्वाचे) लिंबाबाई मुंडे यांचे निधन
>परळी (बीड) : भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पंडितअण्णा मुंडे यांची आई लिंबाबाई पांडुरंग मुंडे (१०२) यांचे मंगळवारी पहाटे वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे मुंबईहून परळीकडे रवाना झाले. ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे-पालवेसुद्धा कुटुंबासमवेत परळीत दाखल झाल्या.लिंबाबाई मुंडे यांच्या पश्चात मुलगा पंडितअण्णा मुंडे, मुलगी सरुबाई कराड व नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर परळीमधील स्मशानभूमीत सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले. मागील काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच अनेक मान्यवरांनी परळीत येऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले. मंगळवारी शहरातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद ठेवण्यात आली होती. (प्रतिनिधी)