महत्वाचे कॉलम न्युज १
By Admin | Updated: August 27, 2015 23:45 IST2015-08-27T23:45:18+5:302015-08-27T23:45:18+5:30
चेहडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवावी

महत्वाचे कॉलम न्युज १
च हडी परिसरात स्वच्छता मोहीम राबवावीनाशिक : चेहडी परिसरात ठिकठिकाणी कचर्याचे साम्राज्य असून, डासांच्या संख्येतही वाढ झाली आहे. मनपा सफाई कर्मचारी या परिसरात फिरकत नसल्याची तक्रार स्थानिक नागरिकांनी केली आहे.पोलीस बंदोबस्त वाढविण्याची मागणीनाशिक : पंचवटी कारंजा परिसरात रिक्षाचालक आणि व्यावसायिकांच्या हुल्लडबाजीमुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले असून, टवाळखोरांना चाप लावण्याच्या दृष्टीने पोलिसांनी लक्ष देण्याची मागणी होत आहे.राखी मेकिंग कार्यशाळाउत्साहातनाशिक : वाघ गुरुजी बालशिक्षण विद्यालयात इयत्ता पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांसाठी राखी बनविण्याची कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी हस्तकला, तसेच टाकाऊतून टिकाऊ साहित्यापासून राख्या बनवल्या.जाधवनगरमध्ये पाण्याचा अपव्ययनाशिक : अशोकनगर येथील जाधव संकुल परिसरात जलवाहिनीमधून पाण्याची गळती सुरू असून, दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याने पाणीपुरवठा विभागाने याकडे लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.पंचवटी ते त्र्यंबक परिसर दिंडीमयनाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे शहरासह जिल्ातील वातावरण भक्तिमय झाले असून, पंचवटी ते त्र्यंबक मार्गावरील दिंड्या लक्ष वेधत असून, सामान्य नागरिकांसाठी आकर्षणाचा केंद्र ठरत आहे.मखमलाबाद नाका सिग्नल बंद अवस्थेतनाशिक : मखमलाबाद नाका येथील सिग्नल वारंवार तक्रार करूनही प्रशासनातर्फे सुरू केले नसल्याने वाहनधारकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी होत आहे.उंटवाडी परिसरात अवैध अमली पदार्थविक्रीनाशिक : उंटवाडी खेतवानी लॉन्स प्रवेशद्वाराजवळ असलेल्या झोपडपीत घरवजा दुकानातून सर्रासपणे अमली पदार्थांची विक्री होत असून, रात्री उशिरापर्यंत येथे टवाळखोरांचा राबता असतो. पोलीसदेखील याठिकाणी रात्री खरेदी करताना दिसतात.अंबड लिंकरोड येथील बँकांना पार्किंग नाहीनाशिक : कामटवाडे परिसरातील त्रिमूर्ती चौक-अंबड लिंकरोड येथील युनियन बँक, अभ्युदय बँक, बँक ऑफ बडोदा आणि इतर बँकांना ग्राहकांसाठी पार्किं गची सोय नसल्याने थेट रस्त्यांपर्यंत पार्किंग होत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.वाहनचालकांकडून वाहतूक लेनचे उल्लंघननाशिक : जुने सीबीएस आणि मेळा बसस्थानक परिसरात शहराकडून कॉलेजरोडकडे जाणार्या मार्गावर अनेक वाहनधारकांकडून ओव्हरटेक करण्यासाठी दुभाजक प्यांचे नियम पाळले जात नाही, तसेच वाहनवेगावर मर्यादा घालण्याची मागणी होत आहे.सिंहस्थ पार्श्वभूमीवर खाद्यपदार्थांमध्ये भेसळनाशिक : सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात खाद्यपदार्थांमध्ये भेसळीची शक्यता व्यक्त केली जात असून, नागरिकांनी सावध राहावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.द्वारका परिसरात वाहतूक कोंडीनाशिक : द्वारका चौफुलीवर सतत होणार्या वाहतूक कोंडीमुळे परिसरातील नागरिक, तसेच वाहनचालक त्रस्त झाले आहेत. या चौफुलीवरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.जॉगिंग ट्रॅकवर रंगतो क्रिकेटचा सामनानाशिक : गोल्फ क्लब मैदानावरील जॉगिंग ट्रॅकवर सूचना फलक असूनदेखील येथे युवकांकडून क्रिकेट खेळले जात असल्याने व्यायामासाठी येणार्या नागरिकांना चेंडू लागणे, तसेच खेळाडूंच्या असभ्य वर्तणुकीला सामोरे जावे लागत आहे.जगतापनगर परिसरात खड्ड्यांचे साम्राज्यनाशिक : सिडको येथील मातोश्री जगतापनगर परिसरातील सरस्वती विद्यालय ते गोविंदा पेट्रोलपंपापर्यंतचा रस्ता खड्ड्यांच्या समस्यांनी ग्रासला असून, खड्ड्यांमुळे वाहन खराब होण्याच्या आणि पाठदुखीच्या समस्यांमध्ये वाढ झाली आहे.