महत्वाचे.... संक्षिप्त बातम्या

By Admin | Updated: August 18, 2015 21:37 IST2015-08-18T21:37:08+5:302015-08-18T21:37:08+5:30

प्लास्टिक पिशव्यामुळे जनावरे धोक्यात

Important .... Abstract News | महत्वाचे.... संक्षिप्त बातम्या

महत्वाचे.... संक्षिप्त बातम्या

लास्टिक पिशव्यामुळे जनावरे धोक्यात
कोराडी : मोकाट जनावरे वाहतुकीच्यादृष्टीने डोकेदुखी ठरत आहे. ही जनावरे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावरील प्लास्टिकच्या पिशव्या मोठ्या प्रमाणात खात असल्याने तसेच त्या पिशव्याचे विघटन होत नसल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे, अशी माहिती पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
...
पांदण रस्त्यांअभावी शेतकऱ्यांची गैरसोय
सावनेर : ग्रामीण भागातील अनेक शिवारात शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता नाही. बहुतांश रस्त्यांवर अतिक्रमण असल्याने पावसाळ्याच्या दिवसांत शेतकऱ्यांची प्रचंड गैरसोय होते. उभ्या पिकातून रस्ता शोधावा लागत असल्याने परस्पर भांडणे होतात. काही ठिकाणी पावसाच्या पाण्याचा निचरा होत नसल्याने दलदल निर्माण होते. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
...
ग्रामीण भागात दारूची अवैध विक्री
कळमेश्वर : तालुक्यातील ग्रामीण भागात दारूची अवैधरीत्या विक्री केली जात आहे. अनेक ठिकाणी सर्रास दारू मिळत असल्याने मद्यपी टुल्ल असल्याचे दिसून येतात. या प्रकारामुळे महिलांमध्ये तीव्र संताप आहे. गावातील अवैध दारूविक्री प्रशासनाने तत्काळ बंदी घालावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
...
प्रवासी निवारा बांधण्याची मागणी
मौदा : तालुक्यातील अनेक प्रवासी निवाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे नव्याने प्रवासी निवारे बांधावे, अशी मागणी करण्यात आली आहे. उन्हाळा व पावसाळ्यात तर प्रवाशांची मोठी गैरसोय होते. त्यामुळे संबंधित प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व प्रवासी निवाऱ्याची मागणी पूर्ण करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
...
पुलाला संरक्षक कठडे लावण्याची मागणी
खापरखेडा : खापरखेडा-कामठी या मार्गावरील दोन पुलांना संरक्षक कठडे नसल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. रात्रीच्या सुमारास सदर पुलावर भरधाव वाहने थेट नाल्यात कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे दोन्ही पुलावर सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ संरक्षक कठडे बसविण्यात यावे, अशी नागरिकांची मागणी आहे.

Web Title: Important .... Abstract News