७७,००० कोटींच्या रेल्वे प्रकल्पांची अंमलबजावणी; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2025 08:40 IST2025-09-14T08:39:28+5:302025-09-14T08:40:09+5:30

पूर्वी फक्त 'लुक ईस्ट' होतं; पण विकास प्रत्यक्षात सुरू झाला तो 'अॅक्ट ईस्ट' धोरणामुळे, असेही अश्विनी वैष्णव यांनी आवर्जून सांगितले.

Implementation of railway projects worth Rs 77,000 crore; Union Railway Minister Ashwini Vaishnav announces | ७७,००० कोटींच्या रेल्वे प्रकल्पांची अंमलबजावणी; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

७७,००० कोटींच्या रेल्वे प्रकल्पांची अंमलबजावणी; केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची घोषणा

एझॉल : ईशान्य भारतात सुमारे अंमलबजावणी सुरू आहे, अशी माहिती रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी शनिवारी येथे दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मिझोराममधील पहिल्या रेल्वेमार्गाचे उ‌द्घाटन करून ऐझॉल-दिल्ली राजधानी एक्स्प्रेसला हिरवा झेंडा दाखविला. त्या पार्श्वभूमीवर वैष्णव यांनी बोलत होते.

मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी

ते म्हणाले की, मिझोराम रेल्वेमार्गाने जोडले गेल्यामुळे पर्यटनाला चालना मिळेल, रोजगार निर्माण होतील आणि स्थानिक उत्पादने नव्या बाजारपेठेत पोहोचतील. ईशान्य भारताचा विकास हा पंतप्रधान मोदींच्या 'अॅक्ट ईस्ट' धोरणाचा परिणाम आहे. २०१४ पूर्वी ईशान्य भारतासाठी रेल्वे बजेट २,००० कोटींचे होते, आता मोदी यांनी ते पाचपटींनी वाढवून १०,००० कोटी रुपये केले आहे.

पूर्वी फक्त 'लुक ईस्ट' होतं; पण विकास प्रत्यक्षात सुरू झाला तो 'अॅक्ट ईस्ट' धोरणामुळे, असेही अश्विनी वैष्णव यांनी आवर्जून सांगितले.

मिझोराममधील बैराबी-सैरांग रेल्वेमार्गाची वैशिष्ट्ये

१ या रेल्वेमार्गात ४५ बोगदे आणि ५५ मोठे पूल आहेत.

हिमालयीन पर्वतरांगा आणि खोल दऱ्यांमुळे हा मार्ग जणू पूल-बोगद्यांची एक साखळीच आहे.

मिझोराममधील एक पूल तर 3 दिल्लीतील कुतुबमिनारपेक्षाही उंच आहे. या रेल्वेमुळे येथील जनतेला ७६ वर्षांनी रेल्वे मिळाली.

या नवीन रेल्वेमार्गामुळे मिझोराम गुवाहाटी, कोलकाता, दिल्ली व इतर अनेक ठिकाणांशी जोडला गेला आहे.

मिझोराम रेल्वेने जोडला गेल्याचे फायदे

संपूर्ण भारताला मिझोरामचं निसर्गसौंदर्य अनुभवता येईल.

पर्यटकांची संख्या वाढेल

होम स्टे उद्योगाला चालना मिळेल

नवीन रोजगार निर्मिती

मालवाहतूक सेवादेखील सुरू होणार

Web Title: Implementation of railway projects worth Rs 77,000 crore; Union Railway Minister Ashwini Vaishnav announces

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.