कांदा निर्यात बंदी तात्काळ उठवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2020 15:28 IST2020-09-17T15:27:17+5:302020-09-17T15:28:24+5:30
कळवण : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्यामुळे कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी कळवण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश तृप्ते यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.

कांदा निर्यातबंदी उठवावी या मागणीसाठी नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश तृप्ते यांना निवेदन देतांना संदीप वाघ, सागर खैरनार, गोरख देवरे संदीप शिंदे आदी.
कळवण : केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी केल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असल्यामुळे कांदा निर्यातबंदी तात्काळ उठवुन शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीसाठी कळवण तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने नायब तहसीलदार डॉ. व्यंकटेश तृप्ते यांना शिष्टमंडळाच्या वतीने निवेदन देण्यात आले.
संपूर्ण नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण अर्थव्यवस्थची नाळ ही कांद्याच्या पिकावर अवलंबून आहे. तालुक्यात २३ हजार हेक्टर क्षेत्रात कांद्याचे उत्पादन घेतले जाते. गेल्या मार्चपासून देशात कोरोना सारखे महासंकट असल्याने कांद्याला म्हणावा तसा भाव नाही मार्च पासून ते आॅगस्ट पर्यंत शेतकºयांना मिळाला नाही. यावेळी कांदा कवडीमोल भावाने विकला गेला. गेल्या काही दिवसापासून शेतकºयांना थोडा बरा भाव मिळत असतानाच केंद्र सरकारने कुठलाही विचार न करता निर्यात बंदी केली. त्यामुळे व्यापारी कांदे घेणार नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
सरकारने शेतकरी बाधंवाचा मागणीचा रास्त विचार करावा व निर्यात बंदी ताबडतोब उठवावी अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस कळवण तालुक्याच्या वतीने करण्यात आली आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संदीप वाघ, सागर खैरनार, गोरख देवरे, लखन गवांदे, संदीप पाटील, ज्ञानेश्वर मोरे, नागेश मोरे, उमेश बच्छाव, ऋ षिकेश भामरे, विजय आहेर, गणेश रौंदळ, चेतन निकम, राम मोरे, हेमंत बहिरम, कमलेश पाटील, विकास गायकवाड, मेघराज ठाकरे, संदीप शिंदे, सतीश पगार, राजेंद्र पगार, अमोल बोरसे, विठ्ठल देवरे आदी उपस्थित होते.