शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
4
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
5
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
6
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
7
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
8
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
9
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
10
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
11
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
12
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
13
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
14
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
15
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
16
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
17
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
18
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
19
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
20
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'

Sushant Singh Rajput Death: सुशांत सिंग प्रकरणी सीबीआय तपासाबाबत झटपट निर्णय; पडद्यामागून कोणी फिरवली चक्रे?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2020 07:33 IST

सीबीआय थेट पंतप्रधानांच्या अखत्यारीत येते व त्या दिवशी तर पंतप्रधान मोदी राममंदिराच्या भूमिपूजनाला अयोध्येस जाण्याच्या तयारीत होते.

हरीश गुप्ता, राष्ट्रीय संपादक, लोकमतसुशांत सिंग राजपूतचा संशयास्पद मृत्यू हा गेले दोन महिने संपूर्ण देशात मोठ्या चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणात पाटण्यात नोंदविलेल्या गुन्ह्याचा तपास ‘सीबीआय’कडे सोपविण्याचा निर्णय बिहार सरकारने ४ ऑगस्ट रोजी घेतला. यानंतर पूर्वी कधीही पाहायला मिळाली नाहीत अशी अतिशय वेगाने चक्रे फिरली. तो दिवस उलटायच्या आत केंद्रीय गृह मंत्रालयाने बिहार सरकारची विनंती मान्य करून प्रकरणाची फाइल सीबीआयकडे देण्याचे ठरविले.

दुसऱ्या दिवशी म्हणजे ५ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयास तसे कळविले. पण गृहमंत्री अमित शहा यांना कोरोनाची लागण झाल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गुरुग्राममधील मेदान्त इस्पितळात पूर्ण ‘बेड रेस्ट’ घेत असताना व सीबीआय हा विषय गृह मंत्रालयाच्या अखत्यारीतील नसूनही हे एवढे झटपट झाले तरी कसे? सीबीआय थेट पंतप्रधानांच्या अखत्यारीत येते व त्या दिवशी तर पंतप्रधान मोदी राममंदिराच्या भूमिपूजनाला अयोध्येस जाण्याच्या तयारीत होते. ‘भिंतीला कान’ लावले असता असे कळले की, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी फोनवर बोलले व इस्पितळात असलेल्या शहा यांनी तेथूनच चक्रे फिरविली. अमित शहा सीबीआयचे संचालक आर. के. शुक्ला यांच्याशी बोलले व अवघ्या पाच तासांत हे प्रकरण सीबीआयच्या ताब्यात गेले.

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतAmit Shahअमित शहाCBIगुन्हा अन्वेषण विभागNarendra Modiनरेंद्र मोदी