शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

आयएमएप्रमुख मन्सूर खान यांची शरणागती पत्करण्याची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 05:39 IST

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केल्यानंतर आयएमएचे प्रमुख मन्सूर खान यांनी व्हिडिओ फीत जारी करून पोलिसांना शरणगती पत्करण्याची तयारी दाखविली आहे

बंगळुरू : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) समन्स जारी केल्यानंतर आयएमएचे प्रमुख मन्सूर खान यांनी व्हिडिओ फीत जारी करून पोलिसांना शरणगती पत्करण्याची तयारी दाखविली आहे, तसेच आयएमएच्या पतनाला जबाबदार असलेल्या बड्या व्यक्तींची नावे उघड करण्याचीही तयारी दाखविली आहे. या बड्या लोकांकडून माझ्या जीवाला धोका आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली आहे.ठेवींवर घसघशीत परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेक लोकांना फसविल्याचा आरोप आयएमए ज्वेल्सवर आहे. गेल्या तीन महिन्यांपासून आयएमएने गुंतवणुकीवर व्याज दिलेले नाही. काही गुंतवणूकदारांना ध्वनिफीत पाठवून काही राजकारणी आणि गुंडांकडून छळ केला जात असल्याने आत्महत्या करण्याची धमकीही दिली होती. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते.जनतेच्या समर्थनार्थ मला परत यायचे असून, पोलिसांकडे सर्व तपशील देईन, तसेच पोलिसांना सहकार्य करण्याची तयारी आहे. पोलीस आणि न्यायालयात मी जबाब देताना सर्वांची नावे उघड करीन. ते सर्व बडे लोक आहेत. ते मला जिवंत सोडणार नाहीत, असे मन्सूर खानने पोलीस आयुक्त आलोक कुमार यांच्या नावे जारी केलेल्या १८ मिनिटांच्या व्हिडिओ फितीत म्हटले आहे. या व्हिडिओची सत्यता आम्ही अद्याप तपासलेली नाही, असे पोलिसांनी सांगितले. खान यांनी स्वत:चा मोबाईल फोन क्रमांकही दिला आहे. खान हे सध्या दुबईत असल्याचे कळते. आयएमएच्या व्यवस्थापकीय कर्मचाऱ्यांनी आणि राजकारण्यांनी खंजीर खुपसला आणि माझा छळ केला. माझ्या कुटुंबियांना लपविण्यास त्यांनी मला भाग पाडले.भारत सोडण्याची चूक होती; परंतु व्यवस्थापनातील माझ्या स्वत:च्या लोकांनी आणि काही जवळच्या राजकीय व्यक्तींनी माझ्या पाठीत खंजीर खुपसून माझा छळ केला. जे काही घडले ते घाईने घडले, असेही खान यांनी यात म्हटले आहे. तथापि, त्यांनी आपला ठावठिकाणा सांगितलेला नाही. १४ जून रोजीच मला माघारी यायचे होते. मी विमानतळावर पोहोचलोही होतो; परंतु तुम्ही जाऊ शकत नाहीत, असे सांगून मला विमानात बसू दिले नाही.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी