धर्मगुरूंना मी घाबरत नाही-इरफान खान
By Admin | Updated: July 3, 2016 01:41 IST2016-07-03T01:41:23+5:302016-07-03T01:41:23+5:30
इद उझ-जुहानिमित्त करण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीवर प्रश्नचिन्ह उभे करणारा बॉलीवूड अभिनेता इरफान खानला मुस्लिम मौलवींच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

धर्मगुरूंना मी घाबरत नाही-इरफान खान
नवी दिल्ली : इद उझ-जुहानिमित्त करण्यात येणाऱ्या प्राण्यांच्या कत्तलीवर प्रश्नचिन्ह उभे करणारा बॉलीवूड अभिनेता इरफान खानला मुस्लिम मौलवींच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. तथापि, आपण धर्मगुरूंना घाबरत नाही, कारण आपण काही धर्माच्या ठेकेदारांचे सरकार असलेल्या देशात राहत नाही, असे इरफानने त्यांना सुनावले आहे.