शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

"मी थोडा लोभी आहे, मला फक्त जिंकायचं नाहीये..." सोनम वांगचुक यांची पहिली प्रतिक्रिया; सांगितल्या तुरूंगातील आठवणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 18:26 IST

जोधपूर तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेत सोनम वांगचुक म्हणाले की, वैयक्तिक सुटका हा विजय नाही, तर लडाख आणि हिमालयाच्या प्रश्नांसाठीचा खरा लढा अजूनही सुरू आहे.

लडाखचे पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांच्या विरोधातील आरोप केंद्र सरकारने मागे घेतले.  जोधपूर मध्यवर्ती कारागृहातून त्यांची सुटका झाली.  यानंतर आज त्यांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली.  यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांच्या वैयक्तिक सुटकेला विजय मानले जाऊ शकत नाही, कारण खरा लढा लडाख आणि हिमालयाच्या प्रश्नांसाठीच आहे.

वांगचुक यांनी आपल्या टीमचे आभार मानत म्हटले, "माझ्या कायदेशीर टीमने प्रत्येक टप्प्यावर मला पाठिंबा दिला आणि मी त्यासाठी त्यांचा आभारी आहे. आम्हाला खात्री आहे की एक दिवस आम्ही जिंकू. पण मी थोडा लोभी आहे. मला फक्त माझा स्वतःचा विजय नको आहे, मला लडाख आणि हिमालयाचा विजय पाहायचा आहे, जो अजून झालेला नाही, असेही वांगचुक म्हणाले.

इच्छामरण म्हणजे काय? २-३ आठवड्यांचा वेळ का लागतो? डॉक्टरांनी उलगडलं 'त्या' शेवटच्या प्रवासाचं सत्य

तुरुंगातील दिवसांची आठवण सांगताना वांगचुक म्हणाले, त्यांना अचानक ताब्यात घेण्यात आले.  जवळपास १० दिवस त्यांचा त्यांच्या कुटुंबाशी किंवा वकिलांशी कोणताही संपर्क नव्हता. तो अनुभव कठीण होता, त्यांनी त्याचे वर्णन संघर्षाचाच एक भाग असे केले.

वांगचुक यांना १७० दिवस तुरुंगात होते

केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रीय सुरक्षा कायद्या (NSA) अंतर्गत असलेली त्यांची जवळपास १७० दिवसांची नजरकैद रद्द केल्यानंतर वांगचुक यांची सुटका करण्यात आली. लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूचीअंतर्गत घटनात्मक संरक्षण मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान त्यांना ताब्यात घेण्यात आले होते.

पत्रकार परिषदेत वांगचुक यांनी सरकार आणि जनता या दोघांनाही लवचिक भूमिका घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, "संवाद ही देवाणघेवाणीची प्रक्रिया आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांप्रति संवेदनशील आणि व्यावहारिक असले पाहिजे.

चर्चा अनावश्यकपणे लांबवल्यास अर्थपूर्ण तोडगा निघण्यास अडथळा येऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. त्यांचा संघर्ष वैयक्तिक नसून लडाखचे पर्यावरण, संस्कृती आणि हक्कांचे संरक्षण करण्यासाठी आहे आणि हा लढा सुरूच राहील, असे स्पष्टच वांगचुक यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Sonam Wangchuk released, says fight for Ladakh and Himalayas continues.

Web Summary : Sonam Wangchuk released from jail after charges dropped. He emphasizes the fight for Ladakh's environment and rights isn't over. He urges flexibility from both government and people, highlighting the need for dialogue and practical solutions to protect Ladakh.