अवैध सावकारी व्यवसाय; ४३ लाखांची कागदपत्रे जप्त

By Admin | Updated: July 15, 2015 23:38 IST2015-07-15T23:38:21+5:302015-07-15T23:38:21+5:30

अक्कलकोट : शहरातील आझाद गल्लीतील बेबीनंदा बसवणप्पा इचगे यांच्या घरावर सावकारीविरोधी पथकाने धाड टाकून तब्बल ४३ लाख २६ हजार ४०० रुपयांचे अवैध सावकारी कागदपत्रे जप्त केली.

Illegal moneylenders; 43 lakh documents seized | अवैध सावकारी व्यवसाय; ४३ लाखांची कागदपत्रे जप्त

अवैध सावकारी व्यवसाय; ४३ लाखांची कागदपत्रे जप्त

्कलकोट : शहरातील आझाद गल्लीतील बेबीनंदा बसवणप्पा इचगे यांच्या घरावर सावकारीविरोधी पथकाने धाड टाकून तब्बल ४३ लाख २६ हजार ४०० रुपयांचे अवैध सावकारी कागदपत्रे जप्त केली.
बेबीनंदा इचगे या अवैधरित्या सावकारी व्यवसाय करीत असल्याची तक्रार सुधाकर गुडाचार्य जोशी यांनी सहा़ निबंधक, सहकारी संस्थेकडे केली होती़ त्यानुसार ए़ डी़ सातपुते, पोनि सी़ के़ निरावडे, सपोनि पी़ पी़ सुर्वे, एस़ व्ही़ कुंभार यांच्या पथकाने बुधवारी इचगे यांच्या घरावर धाड टाकली़ यावेळी १ लाख ७५ हजारांचे तीन धनादेश व कोरे निरंक दोन धनादेश, २६ लाख ९३ हजार रुपये असे स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलेले कागद, १४ लाख, ५८ हजार ४०० रुपयांचे स्टॅम्प आदी कागदपत्रे पोलिसांनी जप्त केली आहेत़ जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार, कृष्णकांत उपाध्याय यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली़ वर्षभरात अशा प्रकारची ही पाचवी मोठी कारवाई आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Illegal moneylenders; 43 lakh documents seized