भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान आता युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने ऑपरेशन सिंदूर केल्यानंतर आता बिथरलेल्या पाकिस्तानने हल्ला करण्यास सुरुवात केली आहे. मात्र, पाकिस्तानचे सगळे हल्ले भारताने उधळून लावले आहेत. भारताची तिन्ही सैन्य दलं पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्यास सज्ज झाली आहेत. दरम्यान, देशभरातील सैनिकांच्या सुट्ट्या रद्द करून त्यांना कर्तव्यावर परतण्यास सांगितले आहे. या दरम्यान एका जवानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओ पाहून नेटकरी देखील त्याचे खूप कौतुक करत आहेत.
आता आईस्क्रीम लाहोरमध्ये... भारत आणि पाकिस्तानमधील तणाव लक्षात घेता, लष्कराने सर्व सैनिकांच्या सुट्ट्या तात्काळ रद्द केल्या आहेत. अशा परिस्थितीत सैनिक कर्तव्यावर परतत आहेत. या दरम्यान, अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हरल होत आहेत. असाच एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सुट्टी रद्द झाल्याने कामावर परतलेला एक जवान म्हणतो की, 'मी ४५ दिवसांची रजा घेऊन घरी आलो होतो, पण आता आम्हाला पुन्हा बोलावण्यात आले आहे. उद्या मी देखील येथून निघणार आहे. आता आपण पुन्हा भेटू की नाही, याची कोणतीही खात्री नाही. पण, भारताला आणि भारतीयांना काहीही होऊ देणार नाही, याची शाश्वती देतो. जेव्हा तुम्ही ऐकाल की, भारताने पाकिस्तानवर हल्ला केला आहे, तेव्हा आम्ही तुम्हाला लाहोरमध्येच सापडू. आता पुढचे आईस्क्रीम आणि ज्यूस लाहोरमध्ये घेऊ."
नेटकऱ्यांनी केलं कौतुक!
सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नेटकरीही जवानाचे खूप कौतुक करत आहेत. 'याकडे असे सैनिक असतात, तेव्हा आपल्याला कुणीही नुकसान पोहोचवू शकत नाही', असे एका युजरने म्हटले आहे. अनेक लोक या व्हिडीओवर कमेंट करून भारतीय सैन्याचे कौतुक करत आहेत. इतर लष्करी जवानांचे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. प्रत्येक जवान आपल्या कर्तव्यासाठी आणि देशाचं संरक्षण करण्यासाठी सज्ज झाला आहे.