आयआयटीनं 90 हजारांची फी 2 लाखांपर्यंत वाढवली
By Admin | Updated: April 7, 2016 12:45 IST2016-04-07T12:37:02+5:302016-04-07T12:45:07+5:30
केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी या फीवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे.

आयआयटीनं 90 हजारांची फी 2 लाखांपर्यंत वाढवली
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ७- गेल्या महिन्यात आयआयटीच्या संस्थेनं दुपटीनं फी वाढीला परवानगी दिली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी या फीवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. यामुळे आयआयटीच्या विद्यार्थ्यांची फी दुपटीनं वाढवली जाणार आहे.
सध्या वार्षिक 90 हजारांपर्यंत असलेली फी जवळपास 2 लाखांपर्यंत वाढवण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात या फीवाढीच्या प्रस्तावाला आयआयटीनं मान्यता दिली आहे. आयआयटी काऊंन्सिलच्या स्थायी समितीनं ही फी तिपटीनं वाढवण्याचा प्रस्ताव ठेवला होता.
मात्र तो प्रस्ताव फेटाळून केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणींनी दुपटीनं वाढवण्यास परवानगी दिली आहे. मात्र स्मृती इराणींनी दिलेल्या आश्वासनानुसार अनुसूचित जाती-जमाती, दलित, अपंग विद्यार्थ्यांच्या फीमध्ये कोणतीही वाढ केली नाही आहे.