IIT Baba Abhay Singh : प्रयागराज येथे आयोजित महाकुंभ 2025 दरम्यान चर्चेत आलेले IIT बाबा अभय सिंह आता आपल्या लग्नामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. अभय सिंह सोमवारी (6 एप्रिल) आपल्या पत्नीससह हरियाणातील झज्जर येथील निवासस्थानी दाखल झाले. त्यांनी 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्रीच्या दिवशी हिमाचल प्रदेशातील अघंजर महादेव मंदिरात लग्न केल्याची माहिती आहे.
पत्नीही इंजिनिअर; सध्या धर्मशाळेत वास्तव
अभय सिंह यांनी सांगितले की, ते आणि त्यांची पत्नी प्रतीका सध्या हिमाचल प्रदेशातील धर्मशाळा येथे साधे जीवन जगत आहेत. त्यांची पत्नी मूळ कर्नाटकची असून, तीदेखील इंजिनिअर आहे. दोघेही आपल्या नव्या आयुष्याबद्दल आनंदी असल्याचे त्यांनी सांगितले.
झज्जरमध्ये कुटुंबीयांची भेट
सोमवारी अभय सिंह झज्जर येथे आपल्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आले होते. यावेली ते म्हणाले की, आध्यात्मिकतेकडे वळण्यापूर्वी ते वडिलांच्या कार्यालयात बसून कायदेशीर कागदपत्रे आणि केस स्टडी पाहायचे. जीवनाचा अर्थ शोधताना त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्र सोडून आध्यात्मिक मार्ग निवडला.
‘सनातन युनिव्हर्सिटी’ स्थापन करण्याची योजना
अभय सिंह यांच्या पत्नी प्रतीका यांनी सांगितले की, अभय अत्यंत साधे, प्रामाणिक आणि सत्यप्रिय व्यक्ती आहेत. दोघांची भेट सुमारे एक वर्षापूर्वी झाली होती. दोघांनी मिळून भविष्यात ‘सनातन युनिव्हर्सिटी’ सुरू करण्याची योजना आहे. या संस्थेत गुरु, साधक आणि अध्यात्माशी संबंधित लोकांना एकत्र आणण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
IIT बॉम्बे ते अध्यात्माचा मार्ग...
अभय सिंह मूळ हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील सासरौली गावचे रहिवासी आहेत. त्यांचे वडील कर्ण सिंह हे वकील असून झज्जर बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष राहिले आहेत. अभय सिंह यांनी IIT बॉम्बे येथून एरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले, नंतर कॅनडामधील एरोस्पेस कंपनीत नोकरी केली. त्यांना सुमारे 3 लाख रुपये मासिक पगार होता. पण, नोकरी सोडून आध्यात्मिक मार्ग स्वीकारला.
महाकुंभ 2025 मध्ये झाले होते व्हायरल
महाकुंभ 2025 मध्ये साधू वेशात दिसल्यानंतर अभय सिंह सोशल मीडिया आणि न्यूज चॅनेलवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. यशस्वी इंजिनिअर ते आध्यात्मिक साधक असा त्यांचा प्रवास देश-विदेशात चर्चेचा विषय ठरला होता.
Web Summary : IIT Baba Abhay Singh, famed from Prayagraj Kumbh, married an engineer. They plan a 'Sanatan University,' embracing simple life, spirituality after his lucrative engineering career.
Web Summary : प्रयागराज कुंभ से प्रसिद्ध आईआईटी बाबा अभय सिंह ने इंजीनियर से शादी की। वे 'सनातन विश्वविद्यालय' की योजना बना रहे हैं, अपने आकर्षक इंजीनियरिंग करियर के बाद सरल जीवनशैली और आध्यात्मिकता को अपना रहे हैं।