शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्या आदेशाकडे तीन वेळा दुर्लक्ष केलं, परिणाम भोगावे लागतील'; पतंजली प्रकरणात SC ची कडक भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 13:18 IST

...यापूर्वी 2 एप्रिलला झालेल्या सुनावणीत पतंजलीच्या वतीने माफीनामा सादर करण्यात आला होता.

पतंजलीच्या दिशाभूल करणाऱ्या जाहिरातीसंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी बाबा रामदेव आणि बाळकृष्ण हे दोघेही न्यायालयात उपस्थित होते. न्यायमूर्ती हिमा कोहली आणि न्यायमूर्ती अहसानुद्दीन अमानुल्लाह यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी सुरू आहे. यापूर्वी 2 एप्रिलला झालेल्या सुनावणीत पतंजलीच्या वतीने माफीनामा सादर करण्यात आला होता.

सुनावणीदरम्यान सॉलिसिटर जनरल म्हणाले, या प्रकरणात बिनशर्त माफी मागावी, असे आम्ही सुचवले होते. न्यायालयाने स्वामी रामदेव यांचे बिनशर्त माफीचे प्रतिज्ञापत्र स्वीकारण्यासही नकार दिला आहे. न्यायमूर्ती अमानुल्लाह म्हणाले, या लोकांनी आमच्या आदेशाकडे तीन वेळा दुर्लक्ष केले आहे. यांनी चूक केली आहे. याचे परिणाम यांना भोगावे लागतील.

आम्ही प्रतिज्ञापत्र फेटाळत आहोत - न्यायालयजस्टिस अमानुल्लाह म्हणाले, आपण प्रतिज्ञापत्रात फसवणूक करत आहात. हे कुणी तयार केली? मला आश्चर्य वाटते. तसेच, आपण असे प्रतिज्ञापत्र द्यायला नको होते, असे न्यायमूर्ती कोहली म्हणाल्या. यावर वकील मुकुल रोहतगी म्हणाले, आमच्याकडून चूक झाली. यावर न्यायालय म्हणाले, चूक! अतिशय छोटा शब्द. असो यावर आम्ही निर्णय घेऊ. याला आम्ही जाणून-बुजून न्यायालयाच्या आदेशाची अवहेलना मात आहोत, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

न्यायालयाने म्हटले आहे, 'आमच्या आदेशानंतरही? या प्रकरणात आमची एवढे उदार होण्याची इच्छा नाही. हे प्रतिज्ञापत्र आम्ही फेटाळत आहोत. हा केवळ कागदाचा एक तुकडा आहे. आम्ही अंध नाही! आम्हाला सर्व दिसते.' यावर, मुकुल रोहतगी म्हणाले, लोकांकडून चुका होतच असतात, यावर न्यायालय म्हणाले, मग चुका करणाऱ्यांना भोगावेही लागते. मग त्यांना त्रासही सहन करावा लागतो. या प्रकरणात आमची एवढे उदार होण्याची इच्छा नाही. 

टॅग्स :Baba Ramdevरामदेव बाबाpatanjaliपतंजलीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय